आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमेक:‘अला वैकुंठपुरमलो’ रिमेकमध्ये, कार्तिकसोबत पुन्हा दिसणार कृती सेनन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा सुपर हिट चित्रपट ‘अला वैकुंठपुरमलो’च्या हिंदी रिमेकमध्ये कार्तिकसोबत कृती सेनन दिसणार आहे. पूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाबाबत कृतीसोबत बोलणे झाले आहे. या चित्रपटात ती पूजा हेगडेची भूमिका करताना दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माते कृतीच्या सतत संपर्कात आहेत. कार्तिक आणि कृतीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळेच निर्माते आणि दिग्दर्शक रिमेकमध्ये दोघांचा रोमान्स दाखवू इच्छितात. कृतीही या चित्रपटाचा भाग होण्यासाठी खूप उत्साही आहे.

या चित्रपटाची कहाणी तिला आवडली आहे. कृती जूनपासून या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. यापूर्वी ती कार्तितसोबत ‘लुका छुपी’ चित्रपटात दिसली होती. कृती ‘मिमी’, ‘हम दो हमारे दो’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘आदिपुरुष’, ‘गणपत’, ‘भेड़िया’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. तर कार्तिक ‘धमाका’, ‘दोस्ताना २’ आणि ‘भूल भुलैया २’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...