आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फायरब्रँड चित्रपट अभिनेता अक्षयकुमार व त्यांची पत्नी टि्वंकल खन्ना कोरोना फंडात दान करण्यात हार्टफुलनेस इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनी सर्वाधिक म्हणजे २५ कोटी रुपये दान केले आहेत. दुसऱ्या स्थानावर टी सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक भूषणकुमार आहेत. त्यांनी ११ कोटी रुपये दान केले. अभिनेता कार्तिक आर्यन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एक कोटी रुपये दान केले. तरीही कार्तिकची लोकप्रियता जास्त ठरली. कारण कोरोनाच्या संकटकाळात लोकांमध्ये मार्गदर्शन करणाऱ्यात तो आघाडीवर होता.
सोशल मीडियावर सर्वप्रथम त्यानेच पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता. तर क्रिकेटर विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा, रणवीर सिंग व दीपिका पदुकाेण या सूचकांकात सर्वात खाली आहेत. कारण त्यांनी मदतनिधीसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन ब्रँड्स (आयआयएचबी) याचा अहवाल एका पॅनलने तयार केला. त्यात त्यांनी रेटिंग दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.