आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर आहे घटस्फोटित:व्यवसायाने डॉक्टर-अभिनेत्री, शेअर करत असते मोटिव्हेशन व्हिडिओज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. हा ताज तब्बल 21 वर्षांनी भारतात परतला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता, त्यापैकी सरगम ​​कौशलने बाजी मारली आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेली सरगम व्यवसायाने शिक्षिका आहे. तिने 2018 मध्ये नौदलाच्या अधिकाऱ्याशी लग्न केले. 21 वर्षांपूर्वी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मराठमोळ्या आदिती गोवित्रीकरने हा किताब आपल्या नावी केला होता. हा ताज जिंकणारी आदिती पहिली भारतीय महिला ठरली. आदिती डॉक्टर असण्यासोबतच एक अभिनेत्रीदेखील आहे. भेजा फ्राय, दे दना दान, स्माईल प्लीज, पहेली यांसारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले आहे.

या पॅकेजमधून जाणून घेऊया भारताची पहिली मिसेस वर्ल्ड ठरलेल्या डॉ. आदिती गोवित्रीकरविषयी...

फॅशन, मॉडलिंग तसेच अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आदिती गोवित्रीकरच्या मोहक सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आदिती तितकीच फिट आणि सुंदर दिसते. आजही रॅम्पवॉकवर आदितीने एन्ट्री केली की उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळतात. एव्हरग्रीन आदितीने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे.

आदितीची ड्रेसिंग स्टाइल, तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज देखील लावता येत नाही.आदितीने रॅम्पवॉक, सौंदर्यस्पर्धा आणि फॅशनच्या विश्वास आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. इतकच नव्हे तर तिने बरेच चित्रपटही केले. फॅशन विश्वात या मराठमोळ्या अभिनेत्रीचे भरपूर कौतुक झाले.

आजही आदितीला सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री म्हणून ओळखले जात. आदिती आपल्या फिटनेसच्या बाबतीत एकमद चोख आहे. ती मार्शल आर्ट देखील शिकली आहे. तसेच बॉक्सिंग आणि नियमित व्यायाम आदिती करत असते.

डॉक्टर आहे आदिती गोवित्रीकर
21 मे 1976 रोजी पनवेल येथे आदितीचा जन्म झाला. पनवेल येथील बार्न्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश होता. 1997 मध्ये तिने एमबीबीएसची वैद्यकीय पदवी घेतली. प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात तिने एमएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली.

जाहिरातींमध्ये केले काम
आदितीने 1996 मध्ये ग्लॅडरॅग्स मेगामॉडेल स्पर्धा जिंकल्यानंतर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने 1997 मध्ये आशियाई सुपर मॉडेल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शरीर आणि सर्वोत्कृष्ट चेहऱ्याचा मान पटकावला. काया स्किन क्लिनिक, पॉन्ड्स सारख्या कंपन्यांसाठी तिने मॉडेलिंग केले. हृतिक रोशनसोबतची तिने कोका-कोलाची जाहिरात केली होती.

रिअ‍ॅलिटी शोजमध्ये झळकली आदिती
2001 मध्ये मिसेस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर आदितीने मॉडेलिंग सुरूच ठेवले आणि अनेक बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. तिने 'ये मेरी लाइफ है' या टीव्ही मालिकेत काम केले आहे. 'फिअर फॅक्टर - खतरों के खिलाडी' (2008) मध्ये ती सहभागी झाली होती. 2009 मध्ये आलेल्या 'बिग बॉस' सीझन 3मध्येही ती झळकली.

घटस्फोटित आहे आदिती
आदिनीने आईवडिलांच्या विरोधात जाऊन मुफझल लकडावाला यांच्याशी लग्न केले होते. कॉलेजमध्ये असताना दोघांची भेट झाली होती. 7 वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी 1998 मध्ये लग्न केले. लग्नाच्यावेळी आदितीने नाव बदलून सारा लकडावाला हे नाव ठेवले होता. आदितीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नाच्या काही वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला.

बहीणदेखील आहे अभिनेत्री
आदित गोवित्रीकरला एक धाकटी बहीण असून तिचे नाव आरजू गोवित्रीकर आहे. आरजूनेही काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र तिला अभिनयात हवे तसे यश मिळू शकले नाही. गेल्यावर्षी आरजू गोवित्रीकर हिने नव-याविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. ‘बागबान’ हा चित्रपट आणि ‘नागिन 2’ या मालिकेसाठी आरजूला ओळखले जाते.

शाकाहारी आहे आदिती
अदिती गोड पदार्थांपासून नेहमीच लांब राहते. गोड पदार्थांचे सेवन करणे तिला आवडत नाही. तसेच आदिती शाकाहारी आहे. माणसाचं संपूर्ण शरीरच शाकाहारी खाद्यपदार्थ खाण्यासाठी बनले आहे, असे अदितीचे म्हणणे आहे.

अलीकडेच 'मिसमॅच्ड सीझन 2' मध्ये झळकली आदिती
आदिती आजही अभिनय क्षेत्रात अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच ती मिसमॅच्ड सीझन 2 मध्ये झळकली. याशिवाय ती सोशल मीडिया अ‍ॅक्टिव असून चाहत्यांसाठी कायम मोटिव्हेशनल व्हिडिओज शेअर करत असते.

  • सरगम कौशल बनली मिसेस वर्ल्ड 2022:भारताला 21 वर्षांनी मिळाला ताज, आदिती गोवित्रीकरने 2001 मध्ये पटकावले होते विजेतेपद

भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. हा ताज 21 वर्षांनी भारतात परतला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता, त्यापैकी सरगम ​​कौशलने बाजी मारली आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेली सरगम व्यवसायाने शिक्षिका आहे. तिने 2018 मध्ये नौदलाच्या अधिकाऱ्याशी लग्न केले. सरगमने आपल्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि पती यांना दिले आहे.

कोण आहे सरगम ​​कौशल वाचा?

बातम्या आणखी आहेत...