आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Indian Film And Television Directors Association (IFTDA) Written To CM Uddhav Thackeray Seeking Certain Changes In After Lockdown Shooting Guidelines

शूटिंग-गाइडलाइन बदलण्याची अपील:आयएफटीडीएची मागणी - 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना सेटवर येण्याची परवानगी मिळावी, अमिताभसारखे अभिनेते आजही अ‍ॅक्टिव आहेत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंगच्या मार्गदर्शक सूचनांमधील बदलांसाठी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
  • आयएफटीडीए म्हणाले- कोरोनादरम्यान राज्यात डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता, प्रत्येक शूटिंगच्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीची अट व्यावहारिक नाही

महाराष्ट्र शासनाने चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. यासाठी 16 पृष्ठांची मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली गेली आहे. यात म्हटले आहे की, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना शूटिंग क्षेत्रात येण्याची परवानगी नसेल. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) ने ही मार्गदर्शकतत्त्वे बदलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे.

आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी हे पत्र उद्धव ठाकरे, सांस्कृतिक कार्यांचे मुख्य सचिव डॉ. संजय मुखर्जी यांना लिहिले आहे. पंडित यांनी पत्रात लिहिले - अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परेश रावल, अन्नू कपूर, नसीरुद्दीन शाह, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथुन चक्रवर्ती, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी डॅन्झोगप्पा, दिलीप ताहिल, टीनू आनंद, राकेश बेदी, कबीर बेदी आणि इतर कलाकार अजूनही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा, डेव्हिड धवन, सुभाष घई, श्याम बेनेगल, मणिरत्नम, प्रकाश झा, शेखर कपूर, विधू विनोद चोप्रा, महेश भट्ट, प्रिय दर्शन, गुलजार, जावेद अख्तर आणि इतर दिग्दर्शक ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे ते अजूनही इंडस्ट्रीत काम करत आहे. अशा परिस्थितीत 65 वर्षांवरील लोकांना शूटिंग क्षेत्रात येण्यास बंदी घालणे व्यावहारिक नाही. असे केल्याने आपल्या इंडस्ट्रीतील बरेच मोठे लोक काम करू शकणार नाहीत.

पत्रात त्यांनी आणखी एक बदल म्हणून वैद्यकीय कर्मचा-यांची मागणी केली आहे. आयएफटीडीएच्या म्हणण्यानुसार- आम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे की कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे राज्यात सध्या डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक शूटिंगच्या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिका असणे व्यावहारिक नाहीये. त्याऐवजी, आमचा सल्ला असा आहे की डॉक्टर आणि परिचारिका शूटिंग लोकेशनच्या एरियाच्या आधारे उपस्थित असाव्यात.

बातम्या आणखी आहेत...