आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येत भूमिपूजन, बॉलिवूडमध्ये आनंदाला उधाण:लतादीदी म्हणाल्या - 'आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण विश्व खूप खूश आहे', कंगना रनोट, अनुपम खेर म्हणाले - 'जय श्रीराम'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लता मंगशेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत 12 वाजून 44 मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन केले. यासाठी केवळ 32 सेकंदचा शुभ मुहूर्त होता. तत्पूर्वी 31 वर्षे जुन्या 9 शिलांचे पूजन केले. यावेळी चांदीच्या विटांची पूजा करण्यात आली. 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची निर्मिती सुरू होणार आहे. यामुळे सगळीकडे उत्सवाचे वातावरण आहे. बॉलिवूडमध्येही आनंदाला उधाण आले आहे. लता मंगशेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विट करुन राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणतात - अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण आडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे. आज भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम जन्मभूमी न्यास अध्यक्ष नृत्य गोपाल दासजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या भूमिपूजनाला उपस्थित राहतील. आज कोरोनामुळे लाखो रामभक्त तिथे पोहोचू शकले नसले तरी त्यांचं मन श्रीराम यांच्या चरणीच लीन असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचा मला खूप आनंद आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण विश्व खूप खूश आहे. जणू प्रत्येक श्वास आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून जय श्री राम हा उच्चार होत आहे.

अभिनेता अनुपम खेर यांनी जय श्रीराम असे ट्विट केले आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील जय श्रीराम म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे.

रितेश देशमुख, विंदू दारा सिंग, दिग्दर्शक शेखर कपूर, स्मृती ईराणी यांनीही ट्विट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...