आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शूटिंग:युद्धजन्य परिस्थितीतही रशियात भारतीय चित्रपटाचे शूटिंग जोमात, निर्मात्यांनी शोधले सुरक्षित ठिकाण

अमित कर्ण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियात सुरु असलेल्या चित्रपटांच्या शूटिंगवर युद्धाचा परिणाम झालेला नाही.

इंग्लंड आणि आखाती देशाबरोबरच आता रशियादेखील भारतीय निर्मात्यांचे आवडते शूटिंग स्थळ झाले आहे. काळी काळापासून रशियामध्ये बऱ्याच चित्रपटांची शूटिंग सुरू आहे. विकी कौशलच्या 'सरदार उधम'पासून ते अजय देवगणच्या 'रनवे 34' आणि सलमान खानच्या 'टायगर 3'पर्यंत चित्रपटाचे शूटिंग रशियाच्या मोठ्या शहरात झाले. विशेष म्हणजे, सध्या युक्रेनमध्ये युद्धाची स्थिती ओढवली आहे. मात्र तेथील चित्रपटांच्या शूटिंगवर काहीच परिणाम दिसून येत नाही. आतापर्यंत नागा चैतन्य, रश्मिका मंदाना, मृणाल ठाकूर तेथेच शूट करत होते. दोन महिन्याआधीपर्यंत धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘जुग जुग जियो’ची टीम तेथेच होती.

सोमवारीही अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या पुढच्या प्रोजेक्टबाबत शंका उपस्थित झाली होती. मॉस्को येथील शूट ऑपरेटर सरफराज आलम सफू यांनी दिव्य मराठीकडे याची पुष्टी केली आहे.

युक्रेनच्या सीमेपासून दूर शूटिंगस्थळ
युक्रेनशी युद्धाची परिस्थिती असूनही रशियामध्ये सुरु असलेल्या चित्रीकरणावर याचा प्रभाव न पडण्यामागचे कारण सांगताना सरफराज सांगतात की, रशियामध्ये चित्रीकरण अशा भागात होत आहे, जे युक्रेनच्या सीमेपासून दूर आहेत. त्यामुळेच शूटिंगवर परिणाम झाला नाही. 12 फेब्रुवारीपर्यंत मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना रशियामध्ये तेलुगू प्रोजेक्ट करत होत्या.

बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्ट्सचे शूटिंग रशियात होत आहे
भूमीने अलीकडेच 'भक्षक'चे शूटिंग पूर्ण केले. अर्जुन कपूर उत्तराखंडमध्ये जॉन अब्राहमसोबत मल्याळम चित्रपट 'अय्यपनम कोशियुम'च्या रिमेकचे शूटिंग सुरू करणार आहे. सरफराज पुढे सांगतात, "बॉलिवुड आणि टॉलुवूड दोन्हीचे मोठे प्रोजेक्ट रशियामध्ये शूट केले जात आहेत. नागा चैतन्य 'थँक्यू' चित्रपटासाठी येथे शूटिंग करत होता. त्याचे शेड्यूल 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले. येथे 20 दिवस उणे 10 ते 14 अंश सेल्सिअस तापमानात शूटिंग झाले."

'गणपत'च्या उर्वरित भागांचे शूटिंग रशियातच होणार आहे
रशियामध्ये शूटिंगवर काहीच परिणाम झाला नसल्याचा दावा विकास बहल यांच्या निकटवर्तीयांनी देखील केला आहे. ते म्हणतात, "कोविडच्या वाढत्या केसेसमुळे लंडनममधून गेल्या वर्षी 27 डिसेंबरला टीम भारतात परतली होती. तिथे 7 जानेवारीपर्यंत शूटिंग होणार होते. पण 'गणपत'चे काही भाग लंडनमध्ये शूट होऊ शकले नाहीत. ते रशियात चित्रीत केले जातील. तिथे लोकेशनची रेकी केली जात आहे. मार्चअखेरीस टीम तिथे जाऊ शकते. सध्या या चित्रपटाचे शूटिंग 05 मार्चपासून मुंबईत सुरू होणार आहे."

'रनवे 34'चे शूटिंग रशियाच्या नाइट क्लब आणि रस्त्यांवर करण्यात आले
अजय देवगण आणि करण जोहरच्या बॅनरच्या चित्रपटांचे शूटिंगही गेल्या वर्षी रशियात झाले होते. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, "अजयच्या बॅनरच्या 'रनवे 34'मधील विमानाशी संबंधित एअरपोर्टचे सीन मॉस्को एअरपोर्टवर शूट करण्यात आले आहेत. याशिवाय चित्रपटातील महत्त्वाच्या सीन्सचे शूटिंग तिथल्या नाइट क्लब आणि रस्त्यांवर करण्यात आले आहे. अजय देवगण आणि बाकीचे चित्रपटाचे कलाकार आणि क्रू यांनी 10 दिवस तिथे चित्रीकरण केले. प्रत्यक्षात कतार विमानतळावर जी दृश्ये चित्रीत होणार होती, ती लॉकडाऊनमुळे होऊ शकली नाहीत. त्यामुळे टीमने ते सीन रशियात चित्रित केले होते.

बातम्या आणखी आहेत...