आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवनदीपने जिंकली ट्रॉफी:उत्तराखंडचा पवनदीप राजन ठरला 'इंडियन आयडॉल 12'चा विजेता, एक आलिशान कार आणि 25 लाख रुपये जिंकले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय संगीत रिऑलिटी शो इंडियन आयडल बाराव्या सिझनचा विनर अखेर जाहीर करण्यात आला आहे. पवनदीप राजन इंडियन आयडलच्या बाराव्या सीझनचा विजेता ठरला आहे. तर अरुणिता कांजीलाल शोची फर्स्ट रनरअप ठरली. गायक अनु मलिक, सोनू कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या उपस्थितीत शोचा विनर निवडण्यात आला.

नुकताच या शोचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. यावेळी अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी या सोहळ्याला हजरे लावली होती. यात जावेद अली, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिले. तसेच यापूर्वीच्या सिजनमधील स्पर्धकांनीही दमदार परफॉर्मन्स दिले.

शोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल, तर तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे राहीली तर मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि शानमुखप्रिया चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...