आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात विचार न करता औषधे घेतात लोक:वर्षभरात 500 कोटी अँटीबायोटिक गोळ्यांची विक्री, त्यात एजिथ्रोमायसिनची सर्वाधिक खरेदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापासून भारतात अँटीबायोटीक औषधांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, त्यापूर्वीही देखील काहीशी अशीच परिस्थिती होती. लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथ ईस्ट एशिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासानुसार, 2019 मध्ये देशात 500 कोटी अँटीबायोटिक गोळ्यांचे लोकांनी सेवन केले. यातील अनेक औषधे अशी आहेत, ज्यांना ड्रग कंट्रोलरकडून मान्यताही मिळालेली नाही.

असे झाले संशोधन
संशोधकांनी खासगी क्षेत्रातील औषध विक्री डेटाबेस PharmaTrac मधील डेटाचे विश्लेषण केले. हा डेटा 9 हजार विक्रेत्यांकडून गोळा करण्यात आला. त्यानंतर तज्ज्ञांनी अनेक श्रेणींमध्ये अँटीबायोटिक औषधांची प्रति व्यक्ती खासगी क्षेत्रातील वापराची गणना करण्यासाठी परिभाषित दैनिक डोस (DDD) मेट्रिक्सचा वापर केला. कोणत्याही औषधाचे सेवन करण्यासाठी, सरासरी डोस निश्चित केला जातो, ज्याला DDD म्हणतात.

एजिथ्रोमाइसिन सर्वाधिक विक्री होणारे औषध
संशोधनानुसार, 2019 मध्ये 500 कोटी DDD चा वापर करण्यात आला. हे प्रति 1,000 लोकांमागे दररोज 10.4 DDD इतके आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एजिथ्रोमायसिन 500 मिलीग्राम टॅब्लेटचा वापर देशात सर्वाधिक केला जातो. एका वर्षात त्याचा वापर 7.6% झाला. त्याच वेळी, Cefixime 200 mg टॅब्लेट 6.5% सह दुसऱ्या स्थानावर आहे.

लोक विचार न करता औषधे घेतात
रिपोर्टनुसार, भारतातील लोक विचार न करता अँटीबायोटिक्सचे सेवन करतात आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या साइड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करतात. प्रमुख रिसर्चर डॉ. शफी सांगतात, जी अँटिबायोटिक्स औषधे अज्ञात जीवाणूंविरुद्ध वापरली जातात, त्यांचाही काळजीपूर्वक वापर करावा लागतो. रुग्णाचा जीव धोक्यात असताना आणि त्याच्या आत अज्ञात जीवाणू असल्याचा दाट संशय असतानाच असे औषध वापरावे.

अनेक औषधांना मंजुरी नाही

संशोधनात समाविष्ट असलेली केवळ 45.5% औषधे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या नियमांचे पालन करतात. शफी म्हणाले की, कंपन्यांना केंद्रीय नियामकाच्या परवानगीशिवाय राज्यांकडून परवाने मिळतात. या गोंधळामुळे देशात अँटीबायोटिक औषधांची उपलब्धता आणि विक्री आणखी गुंतागुंतीची होते.

बातम्या आणखी आहेत...