आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या हॉलिवूड ‘टेनेट’ चित्रपटामुळे थिएटर्स आणि वितरकांचा गट आनंदी झाला आहे. ट्रेंड विश्लेषकांच्या मते, चित्रपटाने फक्त चार दिवसांतच पावणेचार कोटी ते पाच कोटींपर्यंतची कमाई केली आहे. आयमॅक्सच्या ठिकाणी तर प्रेक्षकांची उपस्थिती 60 टक्के दिसून आली. त्यामुळे चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा जास्त झाली. लोकांचा हा प्रतिसाद पाहून चित्रपटगृह संचालकांना येणाऱ्या ‘इंदू की जवानी’ आणि ‘वंडर वुमन’कडूनही अपेक्षा आहेत.
‘वंडर वुमन’ 8 ते 10 आणि ‘इंदू की जवानी’ 6 ते 7 कोटी कमवू शकते
दिल्ली सर्किटचे डिस्ट्रिब्यूटर अनिल ध्यानी सांगतात, टेनेट जवळजवळ 700 पडद्यावर रिलीज झाला होता पण ‘इंदू की जवानी’ आणि ‘वंडर वुमन’ तर जवळजवळ 1000 पेक्षाही जास्त स्क्रीन्सवर रिलीज होऊ शकते. ‘वंडर वुमन’ तर आठ ते दहा कोटींची कमाई करू शकते. ‘इंदू की जवानी’देखील सहा ते सात कोटींपर्यंत जाऊ शकते. दोन हॉलिवूड चित्रपटासह सोनी पिक्चर्सदेखील एक जानेवारीला आपला नवा िसनेमा घेऊन येत आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मध्यम बजेटचे चित्रपट आहेत. मात्र लवकरच मोठ्या बजेटच्या चित्रपटांची 26 जानेवारीला घोषणा होऊ शकते.
मार्चपासून प्रदर्शित होणार
ट्रेड विश्लेषक अतुल मोहन म्हणाले, 26 जानेवारीला ‘शेरशाह’ आणि ‘तूफान’ रिलीज होण्याची शक्यता कमी आहे. ‘मुंबई सागा’ आणि ‘सूर्यवंशी’ रिलीज होण्याची शक्यता आहे. इतर चित्रपट मार्चनंतर क्रमवार प्रदर्शित केले जातील. मात्र सध्या लोक घाबरत आहेत. टेनेटने भारतात पाच ते सहा काेटीपेक्षा जास्त कमावले असते. मात्र लोकांनी तो इंटरनेटवर पाहिला आणि डाऊनलोड केला. त्यामुळे कमाईवर परिणाम झाला.
प्रजासत्ताकदिनी मोठी अपेक्षा
प्रजासत्ताकदिनी ‘सूर्यवंशी’ रिलीज होण्याची दाट शक्यता आहे, असे काही सिने साखळी अधिकाऱ्यांचे मत आहे. अन्य मोठी प्रॉडक्शन हाऊससुद्धा त्या तारखेला त्यांच्या चित्रपटांच्या शक्यता नाकारत नाहीत. ‘शेरशाह’, ‘तूफान’ आणि ‘मुंबई सागा’ त्यांच्या जाहीर तारखांची अधिकृत घोषणा करणार असल्याची मोठ्या अपेक्षा आहेत. त्यापैकी फरहान अख्तर, जॉन अब्राहम आणि सिद्धार्थ मल्होत्रासारखे प्रसिद्ध स्टार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.