आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिंग खान शाहरुख आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरुन वाद निर्माण झाला असून इंदूर शहरात एका संघटनेने निदर्शने केली. तसेच शाहरुख-दीपिकाचे पुतळे जाळले.
इंदूरच्या माळवा मिल चौकात वीर शिवाजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी 'बेशरम रंग' या गाण्याला विरोध दर्शवत शाहरुख-दीपिकाचे पुतळे जाळले. या गाण्यातील आशयामुळे हिंदूंचा अपमान झाला असून भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणा-या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
गृहमंत्र्यांनीही गाणे आक्षेपार्ह असल्याचे म्हटले
मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते नरोत्तम मिश्रा यांनी दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला. ‘या चूका सुधाराव्यात’ अशी मागणीही त्यांनी शाहरुखचे नाव घेऊन केली. गाण्यातील काही दृष्य योग्य नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार हा चित्रपट राज्यात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल विचार करेल असेही मिश्रा यांनी म्हटले.
‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ, असे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.