आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:केके यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा, सलमान खानपासून सोनू निगमपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांनी केके यांना वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (केके) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने केके यांची प्राणज्योत मालवली. कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान केके यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केके यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. केके यांना सलमान खान, अजय देवगणसह अनेक गायकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सलमान खानने केके यांना वाहिली श्रद्धांजली
सलमान खानने KK यांच्या स्मरणार्थ एक पोस्ट लिहिली आहे. सलमान खान फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने केके यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, "आम्हाला प्रेम करायला शिकवणारा हा भावपूर्ण आवाज आता आपल्यात नाही. केके यांनी सलमान खानच्या 'हम दिल दे चुके है सनम' सिनेमात 'तडप तडप' हे गाणे गायले होते, जे खूप लोकप्रिय झाले आहे."

अजय देवगणने केले ट्विट
अभिनेता अजय देवगणने ट्विट केले, "हे खूप दुर्दैवी आहे. लाइव्ह परफॉर्मन्सनंतर केके यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी कानावर आली. मी ज्या चित्रपटांशी निगडीत होतो त्यासाठी त्यांनी गाणी गायली आहेत. त्यामुळे त्यांचे जाणे अत्यंत वैयक्तिक वाटत आहे. RIP #KrishnakumarKunnath त्यांच्यासाठी प्रार्थना आणि कुटुंबाचे सांत्वन करतो."

अक्षय कुमारने वाहिली श्रद्धांजली
केके यांच्या निधनाचे वृत्त समजताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही रात्री उशिरा ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्याने ट्विटरवर लिहिले की, "केके यांच्या निधनाबद्दल जाणून अतिशय दु:ख आणि धक्का बसला. ओम शांती."

इम्रानने फोटो शेअर करून केके यांना श्रद्धांजली वाहिली

इमरान हाश्मीनेही केके यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने ट्विट केले आणि लिहिले, "त्यांचा आवाज आणि प्रतिभेसारखे इतर कोणीही नाही... त्यांनी गायलेल्या गाण्यांवर काम करणे नेहमीच खूप खास राहिले आहे. केके तुम्ही आमच्या हृदयात नेहमी राहाल आणि तुमच्या गाण्यांमधून तुम्ही सदैव जिवंत राहाल. RIP लीजेंड kk #ripkk"

गायक सलीम मर्चंटनेही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे

गायक सोनू निगमनेही सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे
या बातमीने प्रसिद्ध गायक सोनू निगमला खूप दुःख झाले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर केके यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, "KK माझा भाऊ... हे ठीक नाही झाले." केके आणि सोनू निगम यांच्यात खूप चांगले बाँडिंग होते.

अदनान सामीने ट्विट करून श्रद्धांजली वाहिली
प्रसिद्ध गायक अदनान सामीने केके यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे.

केके यांच्या निधनाने दुःखी झाला कपिल शर्मा
कॉमेडियन कपिल शर्माने गायक केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कपिलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले - "आम्ही काही काळापूर्वीच भेटलो, किती सुंदर संध्याकाळ होती, माहित नव्हते की ही भेट शेवटची असेल, मन खूप दुःखी आहे, देव तुम्हाला त्यांच्या चरणी स्थान देवो. तुम्ही कायम आमच्या हृदयात असाल. अलविदा माझ्या भावा, ओम् शांती #KK"

बातम्या आणखी आहेत...