आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • INOX Announced Free Movie Tickets Lifetime For All Team India Medal Winners In TOKYO Olympics 2020 And For One Year For All Other Athletes

बिग अनाउंसमेंट:टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाच्या मेडल विजेत्यांना लाइफटाइम मोफत चित्रपट दाखवणार INOX, इतर खेळाडूंना एक वर्षासाठी दिली जाणार सवलत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • INOX ने मोठी घोषणा केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी देशासाठी रौप्यपदक जिंकणार्‍या वेट लिफ्टर मीराबाई चानूसाठी डॉमिनोजने लाइफटाइम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली होती. आता INOX सिनेमानेही टीम इंडियासाठी मोठी घोषणा केली आहे. INOX सर्व मेडल विजेत्यांना लाइफटाइम आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या इतर सर्व खेळाडूंना एक वर्षासाठी विनामुल्य मुव्ही तिकिट देणार आहे.

घरी पोहोचताच मिळाला पिझ्झा
डॉमिनोजने मीराबाई घरी पोहोचताच तिच्या घरी पिझ्झा पाठवले. इम्फाळ येथील 26 वर्षीय चानूने याबद्दल आभार व्यक्त केले आहे. तिने स्वत:पिझ्झाचा आनंद घेत असल्याचे छायाचित्रही शेअर केले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर मीराबाईने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. ब-याच दिवसांपासून पिझ्झा खाल्ला नसल्याचे ती म्हणाली होती. मीराबाईने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तिला पिझ्झा खाण्यासाठी अजिबात वाट पाहायची गरज नाही. तर, मीराबाईला आमच्याकडून लाइफटाइम पिझ्झा मोफत देण्यात येईल, असे डॉमिनो इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर जाहीर करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...