आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहू प्रीत दा व्याह:थाटात पार पडले नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंगचे वेडिंग रिसेप्शन, सासरी झाले नववधूचे जल्लोषात स्वागत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर 24 ऑक्टोबर रोजी राइजिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंगसोबत विवाहबद्ध झाली. शनिवारी दुपारी या दोघांचा दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये आनंद कारज सोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी नातेवाईक, जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांसाठी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सोमवारी पंजाबमध्ये नेहा आणि रोहन यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. यावेळी नेहाने व्हाइट कलरचा लहेंगा परिधान केला होता. त्यावर तिने हि-यांचे दागिने घातले होते आणि भांगात कुंकू भरले होते. तिचा हा लूक लक्ष वेधून घेणारा होता. तर रोहन प्रीत ब्लू सूटमध्ये दिसला.

रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात नेहा-रोहन प्रीत रोमँटिक गाणी गाताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये नेहा पाहुण्यांसोबत ताल धरताना दिसतेय.

  • सासरी झाले जल्लोषात स्वागत

यापूर्वी नेहा आणि रोहन यांचे काही व्हिडिओ समोर आले होते ज्यात नेहाचे तिच्या सासरी जोरदार स्वागत करण्यात आले. पंजाबी ढोलच्या तालावर रोहन आणि नेहाने खूप डान्स केला. दोघांनी नंतर पाहुण्यांच्या उपस्थित केके कापला. यानंतर अंगठी शोधण्याच्या विधीत नेहाने रोहनचा पराभव केला.

  • 20 ऑक्टोबर रोका आणि त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी झाले लग्न

नेहा कक्कर आणि रोहन यांची 20 ऑक्टोबर रोजी मुंबईत रोका सेरेमनी झाली होती. या सोहळ्यात नेहाने गुलाबी रंगाचा इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता तर दुसरीकडे रोहन प्रीतही पारंपरिक रुपात दिसला होता.

नेहाचा हळदीचा समारंभ 23 ऑक्टोबर रोजी दिल्लीत ठेवण्यात आला होता, यासाठी तिचे कुटुंबीय 22 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पोहोचले. नेहाने या सोहळ्याची काही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. नेहा आणि रोहन प्रीत या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सेरेमनीमध्ये नेहाने फुलांच्या दागिन्यांसह पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

दिल्लीत पोहोचताच नेहाच्या लग्न विधींना सुरुवात झाली होती. नेहाची मेंदी काढतानाची काही छायाचित्रे समोर आली होती. ही छायाचित्रे मेंदी आर्टिस्ट राजू मेंदीवालाच्या पेजवर शेअर करण्यात आली होती.

23 ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनचा संगीत सोहळा पार पडला जेथे दोघांनी काही रोमँटिक गाण्यांवर डान्स केला. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी आनंद कारज समारंभ पार पडला.