आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने कुटुंबीयांसोबत दिला बाप्पाला निरोप:गणपती विसर्जनाला सलमानसोबत पोहोचला सोहेल खान, बघा Photos

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबात गणेशोत्सवर मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदा सलमानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते. यावेळी संपूर्ण खान कुटुंब एकत्र आले होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सलमानने कुटुंबीयांसोबत आरती करुन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. गुरुवारी सलमान आणि त्याच्या कुटुंबाने दीड दिवसांच्या आपल्या बाप्पाला निरोप दिला. अभिनेत्याने कुटुंबासह गणपतीचे विसर्जनही केले.

31 ऑगस्ट रोजी सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या वांद्रे येथील घरी गणेश पूजेला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रितेश-जिनिलिया देशमुख, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यासह अनेकांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गुरुवारी सलमान, अर्पिताचे काही जवळचे लोक आणि कुटुंबीयांच्या उपस्थित गणेश विसर्जन करण्यात आले. सलमानसोबतच भाऊ सोहेल खान आणि आई सलमा खान, हेलन यांनीदेखील हजेरी लावली होती.

सलमानच्या गणरायाच्या विसर्जनाचे बघा खास फोटो-

सलमानने कामातून वेळ काढत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
सलमानने कामातून वेळ काढत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
सलमानची धाकटी बहीण अर्पिता हिच्या घरी गणरायाचे आगमन झाले होते.
सलमानची धाकटी बहीण अर्पिता हिच्या घरी गणरायाचे आगमन झाले होते.
अर्पिताचा नवरा आयुष शर्माने बाप्पाचे विसर्जन केले.
अर्पिताचा नवरा आयुष शर्माने बाप्पाचे विसर्जन केले.
अर्पिता आणि आयुष यांच्या घरी दीड दिवस बाप्पा पाहुणचाराला आले होते.
अर्पिता आणि आयुष यांच्या घरी दीड दिवस बाप्पा पाहुणचाराला आले होते.
गणेश विसर्जनाला सलमानसह, सोहेल खान पोहोचला होता.
गणेश विसर्जनाला सलमानसह, सोहेल खान पोहोचला होता.
काही जवळचे नातेवाईक आणि कुटुंबासोबत सलमानने गणेशोत्सव साजरा केला.
काही जवळचे नातेवाईक आणि कुटुंबासोबत सलमानने गणेशोत्सव साजरा केला.
सलमानची आई सलमा खान यादेखील यावेळी उपस्थित होत्या.
सलमानची आई सलमा खान यादेखील यावेळी उपस्थित होत्या.
हेलन यांनीही बाप्पाला निरोप दिला.
हेलन यांनीही बाप्पाला निरोप दिला.
पुढच्या वर्षी लवकर या म्हणत खान कुटुंबाने बाप्पाला निरोप दिला.
पुढच्या वर्षी लवकर या म्हणत खान कुटुंबाने बाप्पाला निरोप दिला.
बातम्या आणखी आहेत...