आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवरुन चित्रपटाची माहिती:अजय देवगणच्या 'मैदान'चे शूटिंग 80 टक्के पूर्ण, 10 कोटीत उभारला फुटबॉल स्टेडियमचा सेट

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माते बोनी कपूर यांनी दिव्य मराठीला सांगितली अपडटे माहिती...
  • 16 एकर मैदानात सुरु आहे शूटिंग, चित्रपटात दिसेल व्हीएफक्स तंत्रज्ञानाचे काम

शुक्रवारी अभिनेता अजय देवगणचा वाढदिवस आहे. त्याचा आगामी चित्रपट 'आरआरआर'चा फर्स्ट लूकदेखील याच दिवशी रिलीज करण्यात आला आहे. सध्या तो मुंबईत 'गंगुबाई कठियावाडी' आणि 'मैदान' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'मैदान'च्या शूटिंगमधून जो वेळ मिळतो, त्यात तो 'गंगुबाई'चे शूटिंग करत आहे. तांत्रिकदृष्ट्या 'मैदान'चे शूटिंग अशा प्रकारे सुरु आहे की, अजयला अधिक वेळ मिळतो.

30 दिवसांच्या शूटिंगला लागतील 80 दिवस
'मैदान'चे निर्माते बोनी कपूर यांनी सांगितले, आमचा चित्रपट 80 टक्के पूर्ण झाला आहे. 30 दिवसांचे काम उरले आहे. मात्र ते पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 80 ते 90 दिवस लागतील. कारण सध्या फुटबॉल सामन्यांचे दृश्य शूट होत आहे. त्यामुळे तीन ते चार दिवसांच्या शूटिंगनंतर मैदान खराब होते. ते ठिक करण्यात पाच ते सहा दिवस जातात. त्यानंतरच तेथे पुन्हा शूिटंग सुरु होते. प्रत्येक सामन्यानंतर पाच ते सहा दिवसांचा गॅप द्यावा लागतो. अशा प्रकारे आम्हाला जवळजवळ 80 दिवस आणखी लागतील.

सेट उभारण्यासाठी लागला प्रचंड पैसा
चित्रपटात फुटबॉल स्टेडियम आणि मैदान दाखवण्यासाठी निर्मात्यांना 10 ते 12 मोठे सेट उभारावे लागले. यासाठी कोलकाता मध्येही शूटिंग करण्यात आली होती. आणि तेथेही अशा प्रकारचे सेट उभारण्यात आले होते. उरलेले काम व्हीएफएक्सच्या माध्यमातून केले जाईल. एक सेट पूर्ण 16 एकर मैदानात लागला आहे. तेथे वेगवेगळे छोटे-छोटे स्टेडियम बनवण्यात आले आहेत. त्यावर 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. निर्मात्यांनी योग्य आकडा सांगितला नाही, तरी चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च केला जात आहे.

475 कोटींमध्ये विकले 'आरआरआर'चे उत्तर भारताचे हक्क
दुसरीकडे, अजय देवगणचा दस-याला रिलीज होणा-या 'आरआरआर'चे नॉर्थ इंडिया राइट्स 475 कोटींमध्ये विकले गेले आहेत. पेन स्टुडिओजचे प्रमुख जयंतीलाल गडा यांनी ते विकत घेतले आहेत. जयंतीलाल गडा याला उत्तर भारत आणि हिंदीच्या परदेशी बाजारात रिलीज करणार आहेत.

दिव्य मराठीसोबत झालेल्या मुलाखतीत गडा यांनी सांगितले, 'हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. व्यापार मंडळात जी रक्कम सांगितली जात आहे, आम्ही त्याच्या समान प्रमाणात त्याचे हक्क विकत घेतले आहेत. हा करार माझ्यात आणि राजामौलींमध्ये झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या माझ्याकडे परदेशातील बाजाराव्यतिरिक्त थिएटर, इलेक्ट्रॉनिक्स, उपग्रह आणि उत्तर भारताचे डिजिटल अधिकार आहेत, तर सध्या दक्षिणेचे लोकल टेरिटरी राजामौलींजवळ आहेत. हा चित्रपट दस-याला पाच हजारांहून अधिक स्क्रिनवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक लार्जर दॅन लाइफच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रकारचे चित्रपट त्यांना थिएटरमध्ये परत आणू शकतात. तोपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, नाही झाला तरी आम्ही ते डिजिटलवर रिलीज करणार आहोत.'

बातम्या आणखी आहेत...