आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:समोर आला कंगना रनोटच्या स्टुडिओचा इनसाइड व्हिडीओ, याचवर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आले होते इनॉग्रेशन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचे हे नवीन ऑफिस कम स्टुडिओ मुबंईतील पाली हिल या पॉश एरियात आहे.

अभिनेत्री कंगना रानोट सध्या मनालीतील तिच्या घरी राहून लॉकडाऊन फॉलो करत आहे. दरम्यान, मुंबईच्या पाली हिलमधील तिच्या ऑफिस स्पेस कम स्टुडिओचा इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे. यावर्षी जानेवारीत कंगनाने तिच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स आणि नव्या ऑफिसचे उद्घाटनही केले.

एली डाकोर या मासिकाच्या एका फीचरमध्ये कंगनाने खुलासा केला की, तिने अशा जागेचे स्वप्न पाहिले होते, जे बघून 1920 च्या काळाचा अनुभव मिळेल. जिथे बर्‍याच गोष्टी हातांनी बनविल्या जात असत. 

ती म्हणते, "गेल्या तीन-चार वर्षांपासून मी पर्यावरणीय पदचिन्हांविषयी अतिशय जागरुक आहे, जे मी कधी मागे सोडले होते. ऑफिस प्लास्टिकमुक्त असेल. आपण पाहू शकता की हिरवळ एक महत्त्वाचा भाग आहे म्हणून दिसेल."

  • काही वर्षांपूर्वी खरेदी केली होती ही बिल्डिंग

बातम्यांनुसार, कंगनाने ही तीन मजली इमारत काही वर्षांपूर्वी खरेदी केली होती. यामध्ये 565 चौ. फूटांचा पार्किंग एरिया वेगळा आहे. ऑफिसचे इंटेरियर शबनम गुप्ता यांनी  डिझाइन केले आहे. त्यांच्या मते, बिल्डिंगच्या प्रत्येक खिडकीतून हिरवळ नजरेत पडले. सोबतच अशा प्रकारे इंटेरियर करण्यात आले आहे, जेणेकरुन अधिकाधिक प्रकाश आणि हवा येत राहील.

  • 10 वर्षांपूर्वी कंगनाने पाहिले होते स्वप्न

कंगनाची बहीण रंगोली चंदेलने याचवर्षी जानेवारी महिन्यात आपल्या ट्विटर हँडलवर स्टुडिओचा फ्रंट लूक रिव्हील केला होता. कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, "कंगनाचा हा स्टुडिओ मुंबईतील प्राइम लोकेशन पाली हिल येथे आहे. 10 वर्षांपूर्वी तिने हे स्वप्न पाहिले होते आणि आज आम्ही देखील ते पाहिले आहे."

  • पहिल्या चित्रपटाची झाली आहे घोषणा

निर्माती म्हणून कंगनाच्या बॅनरच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर आधारित 'अपराजित अयोध्या' या  चित्रपटाची ती निर्मिती करणार आहे. वृत्तानुसार, 'बाहुबली' फ्रँचायझी फेम केव्ही विजयेंद्र प्रसाद 'अपराजित अयोध्या'ची पटकथा लिहिणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...