आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मोहब्बतें'ची 20 वर्षे:या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्यात यशस्वी झाले होते अमिताभ बच्चन, श्रीदेवी साकारणार होती त्यांच्या पत्नीची भूमिका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा तोच चित्रपट आहे ज्याद्वारे अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी पुनरागमन केले.

2000 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या सुपरहिट 'मोहब्बते' या चित्रपटाच्या रिलीजला 27 ऑक्टोबर रोजी 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 20 वर्षांनंतरही लोकांच्या स्मरणात आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी...

हा तोच चित्रपट आहे ज्याद्वारे अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी पुनरागमन केले आणि चित्रपटसृष्टीचे महानायक म्हणून उदयास आले. या चित्रपटात अमिताभ यांनी कडक शिस्तीच्या शाळेच्या प्रिन्सिपलची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांचा इंडो-वेस्टर्न लूक ठेवण्यात आला होता. त्यांचा हा लूक करण जोहरने डिझाइन केला होता. तसेच या चित्रपटातील त्यांचे सर्व कॉश्च्यूम देखील करण जोहरनेच डिझाइन केले होते.

  • काजोल आणि करिश्मा यांना या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती

'मोहब्बतें' चित्रपटात किम शर्माने संजनाची तर शमिता शेट्टीने इशिका धनराजगीरची भूमिका साकारली होती. पण या दोन्ही भूमिका सुरुवातीला अनुक्रमे काजोल आणि करिश्मा कपूर यांना ऑफर करण्यात आल्या, पण काही कारणांमुळे दी ही ऑफर नाकारली होती.

किम शर्मा म्हणते- “हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट आहे. त्यानंतर मी 30-35 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. पण बॅनर, कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या बाबतीत हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. यासाठी चाहते अजूनही सोशल मीडियावर माझी आठवण काढतात.''

  • श्रीदेवी साकारणार होती बिग बींच्या पत्नीची भूमिका

या चित्रपटातील शाहरुख खानच्या पात्राचे नाव आर्यन मल्होत्रा ​​आहे. असे म्हणतात की हे नाव त्याचा मुलगा आर्यनवरुन प्रेरित आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांचीही एक छोटी भूमिका होती, परंतु चित्रपटाच्या लांबीमुळे त्यांची भूमिका नंतर काढून टाकण्यात आली होती. याशिवाय अमिताभ बच्चन यांची पत्नीची भूमिकादेखील या चित्रपटात दिसणार होती. यासाठी श्रीदेवींकडे संपर्क साधला गेला होता, परंतु त्यांच्या नकारानंतर ही भूमिका चित्रपटातून काढून टाकण्यात आली.