आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहा कक्करचे लाइफ फॅक्ट्स:हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळेबाहेर समोसे विकायचे वडील, मदतीसाठी वयाच्या चौथ्या वर्षीपासून जगरातामध्ये भजन गायची नेहा, आता आहे हाइएस्ट पेड सिंगर्सपैकी एक

मुंबई7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • इंडियन शकीरा म्हणून नेहाला ओळखले जाते.

इंडियन शकीरा आणि रॉकस्टार म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याची बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार नेहा येत्या 24 ऑक्टोबर रोजी पंजाबी गायक रोहन प्रीत सिंगसोबत लग्न करणार आहे. नेहा आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. एक नजर टाकुयात तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टींवर...

वडील विकायचे समोसे

 • नेहाचा जन्म 6 जून 1988 रोजी ऋषिकेशमध्ये झाला. त्यावेळी तिचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत होते. आणि वडील मुलगी सोनू कक्करच्या शाळेबाहेर समोसे विकायचे काम करायचे. यामुळे शाळेतील मुले नेहाची बहीण सोनूला चिडवायचे.

बालपणी जगरातामध्ये गायची नेहा

 • नेहाचे आईवडील उदरनिर्वाहासाठी जगरातादेखील करायचे. नेहाची थोरली बहीण सोनू कुटुंबाच्या मदतीसाठी आईवडिलांसोबत जगरातामध्ये गात असे. त्यांना बघून नेहानेदेखील गाणं शिकली.
 • नेहाचा गळा लहानपणापासूनच मधुर होता, यामुळे तिचे खूप कौतुक व्हायचे. यातून नेहा 500 रुपयांपर्यंत कमाई करायची.

एका खोलीच्या भाड्याच्या घरात गेले बालपण

 • नेहा कक्करने मार्च महिन्यात ऋषिकेश येथे बंगला खरेदी केला. याच शहरातील एका भाड्याच्या खोलीत नेहाचे बालपण गेले होते. आपल्या इंस्टाग्रामवरून नेहोने तिच्या बंगल्याची आणि जुन्या घराची छायाचित्रे शेअर केली होती. तिने सांगितले की, या भाड्याच्या एका खोलीत जिथे तिची आई टेबल लावून त्याचा वापर किचनप्रमाणे करायची. जेव्हा या जुन्या घराला बघते तेव्हा खूप इमोशनल होते, असे नेहा म्हणाली होती.

'इंडियन आयडॉल 2' मधून मिळाली ओळख

 • नेहाने इंडियन आयडॉल या सांगितिक रिअॅलिटी शोमधून आपली ओळख निर्माण केली. या शोची सर्वात लहान स्पर्धक नेहा लवकरच शोमधून बाहेर पडली. आणि नंतर याच शोची जज म्हणून ती झळकली.
 • नेहाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांसाठी कोरसमध्ये गायन केले होते. नंतर तिला 'ना आना इस देश मेरी लाडो' या मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळाली. येथून तिच्या करिअरला दिशा मिळाली.
 • नेहाने संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही.
 • 2008 मध्ये नेहाचा नेहा द रॉकस्टार हा डेब्यू अल्बम रिलीज झाला. याचे संगीतकार मीत ब्रदर्स होते. या अल्बममध्ये नेहाने अनेक रोमँटिक गाणी गायली होती.
 • त्यानंतर नेहाने यारिया, क्वीन, गब्बर इज ब्लॅक, सनम रे, कपूर अँड सन्स या चित्रपटांमधील हिट गाणी गायली आणि ती यशोशिखरावर पोहोचली.

आता एका गाण्यासाठी मिळते मोठी रक्कम

 • नेहाने जगभरात आतापर्यंत सुमारे 1000 म्युझिक कॉन्सर्ट्स केले आहेत.
 • रिपोर्ट्सनुसार, एका बॉलिवूड गाण्यासाठी नेहा तब्बल आठ लाख रुपये मानधन घेते. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणा-या गायकांपैकी एक आहे.

हिमांश कोहलीसोबत झाले होते ब्रेकअप

 • 2018 मध्ये बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपमुळे नेहा चर्चेत आली होती. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र यारिया फेम अभिनेता हिमांश कोहलीसोबतचे नेहाचे नाते संपुष्टात आले.

आदित्य नारायणसोबत जोडले गेले होते नेहाचे नाव

 • गेल्यावर्षी 'इंडियन आयडल' या सांगितिक कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणसोबत नेहाची जोडी खूप पसंत केली गेली होती. शोच्या स्ट्रॅटेजीनुसार या दोघांच्या लग्नाची अफवा देखील पसरवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...