आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काकांचा वाढदिवस:गर्लफ्रेंडच्या घरासमोरुन घेऊन गेले होते वरात, सेटवर उशीरा येण्याच्या सवयीला कंटाळून महमूद यांनी उगारला होता राजेश खन्नांवर हात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 जुलै 2012 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस आहे. राजेश खन्ना यांचा जन्म 1942 मध्ये पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार म्हटले जाते.

राजेश खन्ना यांनी आपल्या करिअरमध्ये 180 चित्रपटांमध्ये काम केले. यापैकी 163 फिचर फिल्म्स आणि 17 शॉर्ट फिल्म्स होत्या. आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तीनदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. ते या पुरस्कारासाठी 14 वेळा नॉमिनेट देखील झाले होते. याशिवाय राजेश खन्ना यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 18 जुलै 2012 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

वाढदिवशीच झाला होता मुलीचा जन्म

29 डिसेंबर रोजी राजेश खन्ना यांची थोरली मुलगी ट्विंकल खन्ना हिचा देखील वाढदिवस असतो. काही वर्षांपूर्वी ट्विंकलने तिच्या लहानपणीच्या वाढदिवसाची आठवण शेअर केली होती. राजेश यांच्यासाठी भेटवस्तु यायच्या तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घराबाहेर चाहते गर्दी करायचे. त्यावेळी राजेश खन्ना यांच्यासाठी आलेले गिफ्ट तिच्यासाठीच आहेत असे तिला वाटायचे.

रक्ताने पत्र लिहायच्या तरुणी

राजेश खन्ना यांना रोमँटिक हीरोच्या रुपात पसंत केले जात होते. त्यांच्या डोळ्यांची पापणी हलवणे आणि मान झुकवण्याच्या लकबीचे लोक दिवाने होते. तरुणी तर त्यांना आपल्या रक्ताने पत्र लिहायच्या, तर काहींनी त्यांच्या फोटोबरोबरच लग्न केले होते. काही तरुणींनी आपल्या हातावर राजेश यांचे नाव गोंदवून घेतले होते.

डिंपल सोबत लग्न करुन सगळ्यांना दिला होता आश्चर्याचा धक्का

ज्यावेळी 'बॉबी' सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते, त्यादरम्यान अहमदाबादमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून अनेक मोठ्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी आयोजकांनी कलाकारांसाठी एका चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली होती. विमानात राजेश खन्नाही होते. डिंपलसुद्धा अहमदाबादला त्याच विमानाने जात होत्या. डिंपलच्या बाजूची जागा रिकामी बघून राजेश खन्ना यांनी त्यांना विचारले, की मी तुमच्या शेजारी बसू शकतो का ? डिंपलने त्यांना होकार दिला. हीच राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची पहिली भेट होती.

अहमदाबादमधील कार्यक्रमादरम्यान दोघांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. हे दोघे एकत्र लंच आणि डिनर घेत होते. मुंबईला परतण्याआधी या दोघांची प्रेमकहाणी मुंबईत पोहोचली होती. ज्या लोकांना या दोघांना विमान किंवा चित्रपट महोत्सावात बघितले, त्यांना या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची कुणकुण लागली होती. मात्र इतरांना ही बातमी फक्त गॉसिप वाटले. ही 1972 सालची गोष्ट आहे. यावेळी राज कपूर यांनी डिंपलची निवड त्यांच्या 'बॉबी' सिनेमासाठी केली होती.

'बॉबी' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान डिंपलचे नाव ऋषी कपूर यांच्याबरोबर जोडले गेले होते. राजेश खन्ना डिंपलपेक्षा वयाने बरेच मोठे होते. डिंपल त्यावेळी केवळ पंधरा वर्षांची होती. तर राजेश खन्ना यांनी वयाची तिशी ओलांडली होती. अंजू महेंद्रूबरोबर त्यांचे अफेअर जवळजवळ संपुष्टात आले होते. अंजू महेंद्रूबरोबरच्या सततच्या भांडणांमुळे राजेश खन्ना यांनी डिंपलबरोबर भेटीगाठी वाढवल्या.

एकेदिवशी समुद्रकिना-यावर राजेश खन्ना यांनी डिंपलला लग्नाची मागणी घातली. डिंपल यांनी त्यांना होकार दिला. डिंपलचे वडील चुन्नीभाई कपाडिया यांनीही या लग्नाला परवानगी दिली. धुमधडाक्यात या दोघांचे लग्न झाले. चुन्नीभाई कपाडिया यांच्या जलमहल या घरी शानदार स्वागतसमारंभ पार पडला. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स या लग्नात हजर होते. केवळ ऋषी कपूर आणि अंजू महेंद्रू या लग्नाला अनुपस्थित होते. राजेश-डिंपलच्या लग्नाचा एक छोटा सिनेमा देशभरातील चित्रपटगृहात सिनेमा सुरु होण्यापूर्वी दाखवला गेला.

गर्लफ्रेंडच्या घरासमोरुन घेऊन गेले होते वरात

अंजू महेंद्रू ही राजेश खन्ना यांची पहिली प्रेयसी होती. कदाचित ते पत्नीपेक्षाही जास्त काळ अंजूसोबत राहिले असावेत. जेव्हा अंजू यशासाठी संघर्ष करत होत्या त्या काळातही त्या राजेश खन्नांसोबतच अधिक काळ राहिल्या. डिंपलसोबत लग्न ठरल्यानंतर राजेश खन्ना जाणून बुजून आपली वरात अंजू यांच्या बंगल्यासमोरून घेऊन गेले होते. फक्त हाच क्षण अंजू यांना आठवला असावा. कारण राजेश यांनी तो बंगला अंजू यांना भेट दिला होता. यामुळेच अंजू यांच्या मनात राजेशबद्दल कटुता होती.

जेव्हा महमूद यांनी लगावली होती राजेश खन्नांच्या कानशिलात

ही गोष्ट 1979 ची आहे. झाले असे की, महमूद यांनी त्यांच्या 'जनता हवलदार' या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना साइन केले होते. राजेश खन्ना त्याकाळातील सुपरस्टार होते आणि त्यांचे एक वेगळेच स्टारडम होते. महमूद यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर चित्रपटाचे शूटिंग ठेवले होते. शूटिंगच्या काळात एकेदिवशी महमूद यांच्या मुलाने राजेश खन्नांना बघितले आणि त्यांना हॅलो म्हणून तिथून निघून गेला. यामुळे राजेश खन्ना अतिशय नाराज झाले आणि ते त्या दिवशी सेटवर कुणाशीही बोलले नाहीत. या घटनेनंतर राजेश खन्ना कायम सेटवर उशीरा येऊ लागले. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग खोळंबू लागले. राजेश खन्नांमुळे महमूद यांना तासन्तास वाट बघावी लागली. महमूद या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि त्यात ते अभिनयदेखील करत होते. एकेदिवशी राजेश खन्ना यांच्या उशीरा येण्यावरुन महमूद यांचा त्यांच्याशी वाद झाला आणि त्यांनी सेटवर सर्वांदेखत राजेश खन्नांवर हात उगारला. महमूद म्हणाले होते, तू सुपरस्टार असशील तुझ्या घरी.. माझा चित्रपट करण्यासाठी मी तुला पैसे दिले आहेत, त्यामुळे तुला वेळेत शूटिंग पूर्ण करावे लागले. या घटनेनंतर राजेश खन्ना वेळेत सेटवर येऊ लागले आणि ठरलेल्या दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.

बातम्या आणखी आहेत...