आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुख्य अभिनेता म्हणून सलमान खानचा पहिला चित्रपट 'मैं प्यार किया'च्या रिलीजचा नुकतीच 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या चित्रपटाने सलमान आणि भाग्यश्रीला बॉलिवूडमध्ये यशस्वी केले. या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा आहे जो सलमानने स्वतः शेअर केला होता.
काही वर्षांपूर्वी सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सुरुवातीला आपल्या बारीक शरीरयष्टीमुळे खूप काळजीत होता आणि वजन वाढवण्यासाठी काहीही खायचा. 'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या सेटवर तो एकावेळी 30 पोळ्या आणि केळी खायचा. सलमान पुढे म्हणाला की, आता तो हेल्थची खूप काळजी घेतो आणि अन्नाचा वास घेताच त्याचे पोट भरुन जाते.
भाग्यश्रीने किसिंग सीनला दिला होता नकार
भाग्यश्रीने चित्रपटात किसिंग सीन करायला नकार दिला होता. भाग्यश्रीच्या वडिलांनी तिला चित्रपटांत तोकडे कपडे घालण्यास मनाई केली होती. केवळ सलवार, चुडीदार घालण्याची परवानगी दिली होती. 2015 मध्ये एका मुलाखतीत सलमानने सांगितले होते की, जेव्हा किसींग सीनची वेळ आली तेव्हा मला वाटले की, हा सीन कसा शूट होईल. मी सूरजकडे गेलो आणि हा सीन करणे अनकम्फर्टेबल आहे असे सांगितले. यावर सूरजने म्हटले तू केवळ अनकम्फर्टेबल आहेस पण भाग्यश्री हा सीन करण्यास नकार देत आहे. सूरज यांनी हा सीन शूट न करण्याचे ठरवले. मग शेवटचा पर्याय म्हणून दोघांमध्ये एक काच ठेवण्यात आली आणि हा सीन पूर्ण करण्यात आला.
या फिल्मच्या शूटिंगदरम्यानच भाग्यश्रीने तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन बॉयफ्रेंड हिमालय दासानीसोबत लग्न केले होते. भाग्यश्रीच्या लग्नात सलमान आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या सहभागी झाले होते.
28 कोटींची कमाई झाली
चित्रपटाचे बजेट फक्त 2 कोटी होते, तर कमाई 28 कोटी होती. या चित्रपटासाठी सलमान खानला 31 हजार रुपये देण्यात आले होते. चित्रपटाच्या फक्त 29 प्रिंट्स प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र चित्रपट हिट ठरल्यानंतर हजारो प्रिंट्स जोडण्यात आल्या. सलमानचा हा चित्रपट इंग्रजीत 'व्हेन लव्ह कॉल्स' या नावाने रिलीज झाला होता. गुयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन बाजारातही हा चित्रपट यशस्वी झाला. हा चित्रपट स्पॅनिश भाषेत 'ते अमो' या शीर्षकासह प्रदर्शित झाला होता.
पटकथा 10 महिन्यांत लिहिली गेली होती
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.