आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॅकी श्रॉफची लव्ह स्टोरी:शाही कुटुंबातील सुख सोडून जॅकीसोबत चाळीत राहिली होती त्यांची पत्नी आयशा, वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदा झाली होती भेट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जॅकी त्या मुलीला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडले.

1 फेब्रुवारी रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा करत असलेले जॅकी श्रॉफ यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कहाणीपेक्षा वेगळी नाही. एकेदिवशी जॅकी श्रॉफ रस्त्याच्या कडेला उभे होते, तेव्हा त्यांनी एका 13 वर्षांच्या मुलीला शाळेच्या गणवेशात बसमध्ये बसलेले पाहिले.

जॅकी त्या मुलीला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडले. ते त्याचक्षणी तिच्याकडे गेले आणि तिला तिचे नाव विचारले. इतकेच नाही तर तिला माझ्यासोबत रेकॉर्ड स्टोअरमध्ये चलणार का, असेही विचारले. त्या मुलीने त्यावेळी त्यांना म्युझिक अल्बमची निवड करण्यात मदत केली. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून त्यांची पत्नी आयशा आहे.

आयशापूर्वी दुस-या तरुणीला डेट करत होते जॅकी
त्या पहिल्या भेटीनंतर केवळ जॅकीच नव्हे तर आयशासुद्धा त्यांच्या प्रेमात पडली. मात्र त्यांची लव्ह स्टोरी म्हणावी तितकी सोपी नव्हती. कारण आयशाच्या प्रेमात पडण्यापूर्वी जॅकी दादांच्या आयुष्यात एक दुसरी तरुणी होती. ज्यावेळी जॅकी आयशाला भेटले, त्यावेळी त्यांची गर्लफ्रेंड अमेरिकेत शिक्षण घेत होती. अमेरिकेहून परतल्यानंतर ती तरुणी जॅकीसोबत लग्न करणार होती.

असे लग्नापर्यंत पोहोचले नाते
आयशाकडे त्यावेळी दोनच पर्याय होते, पहिला म्हणजे तिने जॅकीला विसरुन जावे, किंवा त्यांच्या गर्लफ्रेंडला त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगावे. आयशाने दुसरा पर्याय निवडला. तिने जॅकीच्या गर्लफ्रेंडला पत्र लिहून सर्वकाही सांगितले. त्यानंतर 1987 मध्ये जॅकी आणि आयशाचे लग्न झाले.

शाही कुटुंबातून आहे आयशा
आयशा शाही कुटुंबातली मुलगी आहे. श्रीमंतीत तिचे बालपण गेले होते. मात्र जॅकीच्या प्रेमाखातर ती त्यांच्यासोबत चाळीत राहायला तयार झाली. तिने जॅकीसाठी सर्व सुखांचा त्याग केला. गेल्या 34 वर्षांपासून दोघांचा सुखी संसार सुरु आहे.

जॅकी माझ्यासाठी बदलले...
आयशा सांगते की, जॅकी तिच्यासाठी पूर्णपणे बदलले. सुरुवातीला त्यांचे राहणीमान, कपडे, बोलण्याची पद्धत सर्वकाही वेगळे होते. मात्र हळूहळू त्यांनी स्वतःमध्ये बराच बदल घडवून आणला. जॅकी सांगतात, 'आयशा माझ्या आयुष्यात एखाद्या देवीसारखी आली. तिने मला सावरले. मला सभ्य बनवले.'

बातम्या आणखी आहेत...