आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुरमा भोपालींचे किस्से:जगदीप यांनी उदरनिर्वाहासाठी साबण-कंगवा विकला, फक्त 3 रुपयांसाठी टाळ्या वाजवणा-या मुलाची केली होती भूमिका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोमध्ये जाफरी कुटुंबाच्या तीन पिढ्या : थोरला मुलगा जावेद जाफरी आणि नातू मीजानसोबत जगदीप
  • जगदीप म्हणायचे - मला मुंबईत जिवंत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल, परंतु मला चुकीच्या गोष्टी करून पैसे मिळवायचे नाहीत.
  • जगदीप यांनी तीनदा लग्न केले. त्यांना 6 मुले आहेत, त्यांची धाकटी मुलगी मुस्कान आहे जी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

'शोले' या चित्रपटातील सुरमा भोपाली जगदीप उर्फ ​​सैयद इश्तियाक जाफरी यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील विनोदी पर्वाचा अंत झाला, जो महमूद, जॉनी वॉकर, केश्टो मुखर्जी, राजेंद्रनाथ आणि जगदीप यांसारखे कलाकार तो जगले होते. बाल कलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणा-या जगदीप यांनी अनेक अडचणींवर मात करत हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक खास स्थान निर्माण केले होते.

वयाच्या 81 व्या वर्षी या जगाचा निरोप घेणारे जगदीप आपल्या मागे 6 मुले आणि नातवंड सोडून गेले आहेत. एक नजर टाकुयात जगदीप यांच्या आयुष्यावर... 

  • फाळणीमुळे 8 वर्षांचा मुलगा खचला नाही

29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेश येथील दतिया येथे जन्मलेल्या जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी होते. त्यांचे वडील बॅरिस्टर होते. 1947 मध्ये देशाचे विभाजन झाले आणि त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. जगदीप यांची आई मुलांना घेऊन मुंबईत आली आणि उदरनिर्वाहासाठी अनाथाश्रमात स्वयंपाकाचे काम करु लागली होती.

आईची अवस्था बघून जगदीप रडायचे. आईला मदत करण्यासाठी त्यांनी शाळा सोडली आणि रस्त्यावर साबण- कंगवे आणि पतंग विक्रीस सुरुवात केली. एका मुलाखतीत जगदीप यांनी बालपणातील संघर्षाची आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते, जिवंत राहण्यासाठी मला काहीतरी करावे होते, परंतु चुकीच्या गोष्टी करुन मला पैसे कमवायचे नव्हते, म्हणून रस्त्यावर मी सामान विकायला लागलो.

बालकलाकाराच्या रुपात जगदीप
  • 3 रुपयांसाठी चित्रपटात आले

दरम्यान, बीआर चोप्रा 'अफसाना' नावाचा चित्रपट बनवत होता आणि त्यांना एका दृश्यासाठी बालकलाकाराची गरज होती. म्हणून, एक्स्ट्रा सप्लायर मुलांना बोलावण्यात आले, त्यात जगदीप सुद्धा होते. या चित्रपटातील दृश्यात टाळ्या वाजवण्यासाठी त्यांना तीन रुपये मिळाले होते. तर दिवसभर कंगवे आणि साबणा विकून त्यांना फक्त दीड रुपया मिळायचा. जास्त पैसे मिळणार असल्याने त्यांनी चित्रपटात काम केले होते.

अशाप्रकारे सैयद इश्तियाकहून ते मास्टर मुन्ना झाले आणि त्यांची सिने करिअरला सुरुवात झाली. त्यांनी अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले. पण बिमल रॉय यांच्या 'दो बिघा जमीन' या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली.

  • पंडित नेहरू खुश झाले आणि आपला पर्सनल स्टाफ भेट म्हणून दिला 

1957 मध्ये रिलीज झालेला एव्हीएम प्रॉडक्शनच्या बॅनरमधील आणि पीएल संतोषी दिग्दर्शित ‘हम पंछी एक डाल के’ या चित्रपटातील 18 वर्षीय जगदीप यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्यांचा अभिनय बघून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले की, त्यांनी जगदीप यांना काही दिवसांसाठी त्यांचा पर्सनल स्टाफ भेट म्हणून दिला होता.

धाकटी मुलगी मुस्कानसोबत जगदीप
  • जगदीप यांनी 33 वर्षांनी लहान तरुणीशी तिसरे लग्न केले

तिसर्‍या विवाहामुळे जगदीप वादात अडकले होते. झाले असे की, जगदीप यांचा दुसरा मुलगा नावेदला बघायला मुलीकडील मंडळी येणार होती, पण नावेदने लग्नास नकार दिला. कारण त्याकाळात नावेदला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. दरम्यान नावेदचे लग्न ज्या मुलीशी होणार होते, तिची बहीण जगदीप यांना पसंत पडली. त्यांनी लगेच तिला लग्नाची मागणी घातली आणि त्या तरुणीनेही लग्नास होकार दिला.

त्यांची तिसरी पत्नी नाजिमा जगदीप यांच्यापेक्षा 33 वर्षांनी लहान आहे. या लग्नामुळे त्यांचा मोठा मुलगा जावेद जाफरी (जगदीप आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा) त्यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र कालांतराने त्यांच्यातील नाते सामान्य झाले होते. नाजिमा आणि जगदीप यांना एक मुलगी असून मुस्कान हे तिचे नाव आहे. मुस्कान ही तिचा मोठा भाऊ जावेद जाफरींचा मुलगा मिजानपेक्षा फक्त सहा महिन्यांनी लहान आहे. मुस्कान लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार असल्याचे समजते. 

0