आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Interesting Story: Shreyas Talpade Revealed 3 Days Before The Wedding, The Director Of 'Iqbal' Asked To Cancel It, While The Cards Were Also Distributed.

रंजक किस्सा:श्रेयस तळपदेचा खुलासा - लग्नाच्या तीन दिवसाआधी 'इकबाल'च्या दिग्दर्शकाने लग्न रद्द करायला सांगितले होते, लग्नाच्या पत्रिकासुद्धा वाटल्या गेल्या होत्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाबद्दल सुभाष घईंनासुद्धा माहित नव्हते

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'इकबाल' हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. मात्र या चित्रपटात काम करताना श्रेयसला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी श्रेयसला चक्क त्याचे लग्न रद्द करायला सांगितले होते.

नागेश यांनी दिला होता श्रेयसला लग्न रद्द करण्याचा सल्ला
श्रेयसने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, या चित्रपटासाठी त्याला त्याचे लग्न रद्द करावे लागणार होते. श्रेयसने सांगितले, 'इकबाल या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्याच्या तीन दिवस आधी मी नागेश यांच्या सुट्टी मागितली होती. मला 31 डिसेंबरची सुट्टी हवी होती. त्यावेळी नागेश यांना वाटले की मी पार्टीसाठी सुट्टी मागतोय. मात्र जेव्हा त्याच दिवशी माझे लग्न आहे, असे मी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी मला लग्न रद्द करण्याचा सल्ला दिला होता.'

नागेश यांनी दिली होती एक दिवसाची सुट्टी
श्रेयसने मुलाखतीत पुढे सांगितले, 'मी त्यांना म्हणालो की, मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे ज्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्यात. अशात तुम्ही मला लग्न रद्द करायला सांगताय. मी त्यांना खूप समजावले. अखेरीस मी त्यांना म्हटले की हे लग्न लपवून ठेवले जाईल. तेव्हा त्यांनी मला फक्त मला एका दिवसाची सुट्टी दिली होती.'

चित्रपटाच्या प्रीमिअरला नागेश यांची बहीण म्हणून उपस्थित होती पत्नी
श्रेयसने पुढे सांगितल्यानुसार, लग्नाच्या वेळी तो 29 वर्षांचा होता, तर चित्रपटातील त्याचे पात्र इकबाल हे 17-18 वर्षांचे होते. चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळात त्याने कधीही आपल्या लग्नाचा विषय काढला नाही. इतकेच नाही तर त्याने पत्नी दीप्तीलासुद्धा चित्रपटाच्या प्रीमिअरला नागेश यांची बहीण म्हणून उपस्थित राहण्यास सांगितले होते.

लग्नाबद्दल सुभाष घईंनासुद्धा माहित नव्हते
चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांनासुद्धा श्रेयसच्या लग्नाबद्दल माहित नव्हते. 'सुभाष घई यांनादेखील माझ्या लग्नाबद्दल काहीही माहीत नव्हते. जेव्हा दीप्ती चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमांना वारंवार येऊ लागली तेव्हा त्यांनी नागेश यांना विचारले ही कोण आहे? त्यावर नागेश यांनी सुभाष यांना सांगितले ही श्रेयसची पत्नी आहे. यावर त्यांना विश्वास बसत नव्हता, कारण त्यांच्यासाठी मी फक्त 17- 18 वर्षाचा मुलगा होतो,' असे श्रेयसने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...