आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इफ्फी:गोवा येथे दरवर्षी रंगणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पन्नास वर्षांच्या इतिहासात कोरोनामुळे यंदा ‘व्हर्च्युअल’

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोव्हेंबरातील तारखा पुढे ढकलल्या, पुढील वर्षी 16 ते 24 जानेवारी रंगणार ‘इफ्फी’

जगभरातील चित्रपट रसिकांच्या औत्सुक्याचा विषय असणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) कोरोना महासंसर्गाच्या संकटामुळे यंदा प्रथमच व्हर्च्युअल व्यासपीठावर होणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार इफ्फी गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान होणार होता. तो पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या नियोजनाप्रमाणे १६ ते २४ जानेवारी २०२१ असा इफ्फीचा कालावधी ठरवण्यात आला आहे. इफ्फीच्या आयोजनासाठी गोवा हे कायमस्वरूपी केंद्र ठरवण्यात आल्यानंतर प्रथमच अशा प्रकारे महोत्सव पुढे ढकलला गेला आहे. गेल्या वर्षी इफ्फीने सुवर्णमहोत्सवी वर्ष दिमाखात साजरे केले होते. आता ५१ वा इफ्फी एका वर्षाचा गॅप घेऊन साजरा होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.

आॅनलाइन महोत्सवाला अधिक प्रतिसाद : जगभर वर्षातील नियमित काळी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात. चित्रपटांसोबत लघुपट, माहितीपट यांचेही जागतिक महोत्सव होतात. त्यापैकी काही महोत्सव गेल्या तीन महिन्यांत प्रामुख्याने ऑनलाइन व्यासपीठावर पार पडले आहेत. किंबहुना ऑनलाइन चित्रपट महोत्सवाला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. चित्रपट महोत्सवात होणारे व्यावसायिक आणि व्यावहारिक करार, डबिंगच्या परवानग्या, रिमेक, तसेच जगभरातील वितरणाची क्षेत्रे याविषयीची उलाढालही आता ऑनलाइन होत आहे.

इतर महोत्सवांप्रमाणे कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करणार
कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष उपस्थितीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अन्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या मार्गदर्शक सूचना आणि शिष्टाचार लक्षात घेऊन महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला आहे. महोत्सव संयुक्त स्वरूपामध्ये म्हणजे प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांप्रमाणे कोविड-१९ संबंधित सर्व नियम काटेकोरपणे लागू राहतील.

बातम्या आणखी आहेत...