आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Interview। Amitabh Bacchan Birthday Special। Decided To Quit Drinking In Goa! How To Live Time Of Struggle,amitabh Bacchan? Stories From Best Friend Anwar Ali

बिग बींच्या मित्राची मुलाखत:गोव्यात जाऊन घेतला होता दारु सोडण्याचा निर्णय! स्ट्रगलिंगच्या काळात कसे राहायचे बिग बी? जिवलग मित्राने सांगितले तेव्हाचे किस्से...

राजेश गाबा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि मित्र अनवर अली - Divya Marathi
अमिताभ बच्चन आणि मित्र अनवर अली

मुंबई : गोवा म्हटले कि डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे सुंदर समुद्र किनारा. या ठिकाणी जाऊन प्रत्येक जण दारू पार्टीचे स्वप्न हामखास बघतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की याच गोव्याच्या धर्तीवर बिग बी अमिताभ बच्चन यांनी चक्क दारू सोडण्याचा निर्णय घेतला होता. बच्चन यांनी आपले मित्र अनवर अली यांच्या बोलण्यानंतर दारू सोडण्याचा निर्णय घेतला होता. एकेकाळी बच्चन मोठ्या प्रमाणात दारू सेवन करत असे, त्यावर अनवर अली यांनी 'दारू सोडून करिअरकडे लक्ष दे' असा सल्ला बिगबीला दिला होता. आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असून, 'दिव्य मराठी'ने अनवर अली यांच्यासोबत खास बातचीत केली आहे. त्यामध्ये अनवर यांनी बिग बी सोबतच्या आठवणी सांगितल्या आहे. अनवर हे महान कॉमेडियन महमूद यांचे लहान बंधू आहेत. तेव्हापासून बच्चन यांची अनवर यांच्यासोबत खास मैत्री आहे.

अमित दारू सोड

अनवर आणि बच्चन एकसोबत गोव्यातील मंडोवी हॉटेलमध्ये थांबलेले होते. तेव्हा अनवर गोल्ड स्पॉट पित होते. आणि अमिताभ व्हिस्की, रमचे सेवन मोठ्या उत्साहाने करत होते. त्यावेळी बच्चन यांनी मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले होते. त्यावेळी बच्चनला न सांगताच रागाच्या भरात अनवर निघून गेले. दुसऱ्या दिवशी अनवर पुन्हा बच्चन यांना भेटले आणि म्हणाले की, 'अमित तुझ्या करिअरची सुरुवात होत आहे. तुला नेहमी दारू पाजणारे, पार्टी देणारे भेटतील. पंरतु दारू एका कलाकारासाठी योग्य नाही. त्यामुळे तु दारूला सोडून आपल्या करिअरकडे लक्ष दे' असे अनवर, अमिताभ बच्चनला म्हटले होते. तेव्हापासून बच्चन यांनी दारूला कधीही हात न लावण्याच्या निर्णय घेतला. अनवर यांच्या त्या वाक्याने बिगबीचे आयुष्य बदलून गेले. तेव्हा अमिताभ म्हणाले की, 'अन्नू तुझे वाक्य माझ्या काळजाला लागले आहे. आजपासून मी दारूचे एक थेंबही सेवन करणार नाही.' तेव्हा अमिताभ यांनी हातातली व्हिस्कीची बॉटल अनवर यांच्यादेखत फोडून टाकली. आणि म्हणाले..' ले बीड़ू, तेरी दोस्ती की खातिर ये छोड़ दी' त्यानंतर आयुष्यात कधीच बच्चन यांनी दारूला हात सुद्धा लावला नाही. आई वडिलांचे संस्कार, विचार आणि आदर्श यामुळे अमिताभ बच्चन बॉलीवूडचे 'महानायक' झाले आहे.

1969 मध्ये पहिल्यांदा झाली भेट

अनवर यांनी सांगितले की, अमिताभ यांच्यासोबत त्यांची पहिली भेट 1969 मध्ये सांताक्रूज विमानतळावर झाली होती. त्यावेळी जलाल आगा माझ्या सोबत होते. एक तरूण व्यक्ती पांढरा शर्ट, पँन्ट आणि वेस्ट कोट घालून आमच्याकडे आला आणि आपला परिचय द्यायला लागला. 'हॅलो मै अमिताभ' त्यानंतर आम्ही सोबत अहमद अब्बास यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांची सात हिंदुस्तानी या चित्रपटात अमिताभ आणि मी सोबत काम करत होतो. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ आणि माझ्यात मैत्रीसंबंध आणखीणच घट्ट होत गेले. जेव्हा मी एखाद्यावेळी नैराश्यात गेलो तेव्हा, अमिताभ मला धिर देण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा अमिताभ नैराश्यात असे तेव्हा मी त्याला प्रोत्साहन करायचो. तेव्हा मी बिगबी ला वारंवार म्हणायचो की, 'मी नेहमी तुझ्या सोबत आहे'

पुढे अनवर म्हणतात की, अमित आणि मी रोज सकाळी 4 वाजता हाजी अली दरगाह आणि बाबुल नाथ मंदिरात जायचो. त्यानंतर कित्येक दिवस आम्ही प्रोड्यूसर-डायरेक्टर्सच्या ऑफिसला खेट्या लावल्या. कालांतराने अमिताभ बच्चन माझ्यासोबत अंधेरीतील पॅराडाईड इमारतीत शिफ्ट झाला होता. त्यानंतर अमिताभ आणि मी जेव्हा वाटले तेव्हा, कारने मरीन ड्राइववर फिरायला जायचो. त्याकाळी आमच्याकडे पैसे कमी असायचे. कित्येक वेळा असे झाले की, आमच्या गाडीचं डिझेल संपले आणि आम्हाला बसने किंवा लोकलने फ्लॉटकडे परतावे लागले.

हरिवंशराय बच्चन यांची कविता गायचे

अनवर म्हणतात की, आमच्या इच्छा आणि ध्येय दोघांचे समान होते. आम्ही दोघे जण एक सोबतच घरातून काम शोधायला बाहेर पडायचो. आम्हाला गाणी खूप आवडायची त्यामुळे आम्ही दोघेही कधी-कधी किचन मधले भांडी वाजवून जोर-जोरात गाणी गायचो. तेव्हा आम्हाला हरिवंशराय बच्चन यांची 'सोन मछरी' ही कविता खूप आवडायची. अनवर पु़ढे म्हणतात की, शुरुवातीला मी आणि अमिताभ बच्चन आम्ही दोघांनी अनेक डायरेक्टरकडे कामासाठी खेट्या घातल्या. तेव्हा बच्चन अलीगढ़ी कुर्ता, पायजामा, कोल्हापुरी चप्पल परिधान करायचे. जेव्हा आमची कार सिग्नलवर थांबायची तेव्हा अनेक जण सांगायचे की, 'हे तर महमूदचा भाऊ आणि त्याचा मित्र आहे' तेव्हा अमिताभ म्हणायचे की, एक दिवस आपल्याला पाहायला लोकं लाईन लावतील. आणि कालांतराने ती गोष्ट खरी सुद्धा ठरली.

अशी झाली जयासोबत भेट

एकदा आम्ही दोघे जण शिर्डीहून मुंबईकडे निघालो होतो. तेव्हा अचानक आमची गाडी खराब झाली. त्यादरम्यान आम्ही पुण्यात रात्रभर थांबलो. त्यानंतर मी आणि अमित फिल्म इंस्टीट्यूटला सोबत पोहोचलो. तिथेच अमिताभची जया सोबत पहिली भेट झाली. सोबतच डॅनी आणि शत्रुघ्न सिन्हा सोबतही परिचय झाला. अनवर सांगतात की, मी जया वहिनी आणि अमिताभ यांच्या पहिल्या भेटीचं साक्षीदार आहे.

अमिताभ आणि माझी मैत्री ही अनकंडीशनल

अनवार सांगतात की, अमिताभ आणि माझी मैत्री ही अनकंडीशनल आहे. आम्हाला मैत्रीतून काहीही अपेक्षा नाही. फक्त आम्ही दोघेही एकमेकांसाठी प्रार्थना करतो. माझा वाढदिवस 10 मार्चला असतो. त्यादिवशी अमित मला एका कागद्याच्या चिट्ठीवर संदेश लिहून नक्की पाठवतो. तो संदेश फक्त अमिताभ आणि मलाच समजतो. अगदी त्याच प्रकारे मी सुद्धा बिग बीचा वाढदिवस असला तर मीही त्यांना चिट्ठी दिल्या शिवाय राहत नाही. जर त्यादिवशी ते घरी राहिले तर, मी आवर्जून एक लाल गुलाबाचे फुल घेऊन त्यांच्या घरी जातो. पुढे अनवर सांगतात की, अमिताभ आणि माझी मैत्री सुर्य आणि प्रकाशाप्रमाणे आहे. आमच्या मैत्रीत कोणतेही बंधन, अपेक्षा नाही. मी स्वत:ला खुपच नशिबवान समजतो की, मला अमिताभ सारखा मित्र मिळाला. आम्ही जेव्हा पण भेटतो, तेव्हा जुन्या आठवणी हामखास काढतो.

बातम्या आणखी आहेत...