आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Interview: Amitabh Bachchan Did Not Take Fees For The Film Chehre, Director Rumi Jaffrey Said 'Amitabh Bachchan Had Said 'yes' Even Before Listening To The Subject'

वाढदिवसानिमित्त स्पेशल इंटरव्ह्यू:अमिताभ बच्चन यांनी चेहरेसाठी घेतले नाही मानधन, दिग्दर्शक रुमी जाफरी म्हणाले - 'विषय ऐकण्यापूर्वीच अमिताभ बच्चन यांनी दिला होता होकार'

उमेश कुमार उपाध्याय15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खूप आग्रह केल्यानंतर चेहरेच्या नफ्यातील वाटा घेतला

महानायक यावर्षी प्रदर्शित झालेल्या चेहरे या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी 14 मिनिटांचा वन टेक शॉट दिला होता. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी बिग बींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काही खास किस्से शेअर केले आहेत.

रुमी जाफरी म्हणाले, अमिताभ बच्चन यांच्याविषयी अशी एकही गोष्ट नाही जी नवीन असेल. ते सेटवर कायम वेळेत येतात, मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करतात. मी दिग्दर्शित केलेल्या चेहरेसाठी त्यांनी मायनस 17 डिग्रीत शूट केले आणि या वयात नॉन स्टॉप 14 मिनिटांचा वन टेक शॉट दिला. या वयात भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात कोणत्याही कलाकाराने वन टेक शॉट दिलेला नाही. यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. शॉट ओके झाल्यानंतर दीड मिनिटे सेटवर टाळ्या वाजत होत्या. अमिताभ यांनी विषयी ऐकण्यापूर्वीच यात काम करण्यासाठी होकार दिला होता.

खूप आग्रह केल्यानंतर चेहरेच्या नफ्यातील वाटा घेतला
या चित्रपटाच्या स्क्रिप्टने बिग बी इतके प्रभावित झाले की, त्यांनी या चित्रपटासाठी मानधन न घेता काम करण्यास होकार दिला होता. इतकेच नाही तर त्यांनी देशविदेशात 30-35 दिवस शूटिंग केले होते. ते पोलंडला चित्रीकरणासाठी स्वखर्चाने गेले होते. तिथे हॉटेलमध्येही स्वखर्चाने राहिले होते. त्यामुळे आमचे निर्माते आनंद पंडित त्यांना म्हणाले की, तुम्ही मानधन घेतले नाही, तर चित्रपटाच्या नफ्यातील वाटा तुम्हाला घ्यावाच लागेल. खूप आग्रहानंतर त्यांचे नाव पार्टनरशिप डीलमध्ये टाकले होते.

माझ्यामुळे बिग बींना उपाशी झोपावे लागले : रूमी जाफरी
दिग्दर्शक रूमी जाफरी सांगतात, 'बिग बींसोबत काम करण्याचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो. मी भाग्यवान आहे. 'चेहरे’ त्यांच्यासेाबतचा माझा चौथा चित्रपट आहे. आम्ही जेव्हा पोलंडच्या एका डोंगराच्या वरती बनलेल्या रिसॉर्टमध्ये याचे शूटिंग करत होतो, तेव्हा मी लोकेशन जवळच थांबलो होतो, मात्र अमिजी लोकेशनपासून थोडे दूर एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. माझी पत्नीदेखील माझ्यासोबत पोलंडला गेली होती. अमितजी जेव्हा शूटिंग करुन परत येतील तेव्हा माझी पत्नी त्यांना जेवणाचा डबा पाठवून देईल, असे आमच्यात ठरले होते. आम्ही इकडून ड्रायव्हरच्या हाती डबा पाठवला, तिकडे अमितजीदेखील वाट पाहत होते, कारण ते साडे सात वाजेपर्यंत जेवण करतात. मात्र बर्फ पडत असल्याने रस्ते जाम झाले आणि ड्रायव्हर वाहतुकीत अडकला. शिवाय अमितजींनी हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली नव्हती. थंडीत हॉटेल लवकर बंद झाले होते. त्यामुळे त्या रात्री अमितजींना उपाशी झोपावे लागले. मात्र त्यांनी तक्रार केली नाही.'

बातम्या आणखी आहेत...