आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL 2020:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या दमदार विजयानंतर अनुष्का शर्माने केले विराटचे कौतुक, म्हणाली - 'ही विजयाची सुरुवात'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट काेहलीच्या नेतृत्वात विजयाचे अर्धशतक साजरे; दमदार विजयाने बंगळुरूची सुरुवात

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने साेमवारी आयपीएलमध्ये विजयाची नाेंद केली आहे. विराट काेहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद टीमचा पराभव 10 धावांनी केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने 5 बाद 163 धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा 19.4 षटकांत 153 धावांवर धुव्वा उडाला. त्यामुळे टीमचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. बंगळुरू संघाने चार वर्षानंतर लीगमधील आपला पहिला सामना जिंकला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्याच सामन्यात मिळवलेल्या या विजयावर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आनंद व्यक्त केला आहे. 'विजयाची सुरुवात झाली आहे,' अशा आशयाची इंस्टाग्राम पोस्ट लिहून तिने RCB मधील खेळाडूंचे कौतुक केले आहे. तिची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यंदाच्या सत्रात किताबाचा पल्ला गाठण्याच्या इराद्याने विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मैदानावर उतरला. नाणेफेकीचा काैल सनरायझर्स हैदराबाद संघाला मिळाला. मात्र, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने दमदार सुरुवात केली. केरळच्या युवा देवदत्त पड्डिकल (56) आणि अॅराेन फिंच (29) या सलामीच्या जाेडीने संघाला 90 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यात पड्डिकलने शानदार खेळी करताना 42 चेंडूंमध्ये 8 चाैकारांसह 56 धावा काढल्या. यासह त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याचे पदार्पणातील हे अर्धशतक अधिकच चर्चेत ठरले आहे.

त्यानंतर डिव्हिलियर्सने संघाच्या धावसंख्येला गती देत अर्धशतक साजरे केले. त्याने 30 चेंडूंचा सामना करताना चार चाैकार आणि दाेन उत्तुंग षटकारांच्या आधारे 51 धावा काढल्या. हैदराबाद संघाकडून नटरंजन, व्ही.शंकर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली. बंगळुरूकडून युवा गाेलंदाज नवदीप सैनी, चहल व शिवम दुबेची कामगिरी सरस ठरली.

बातम्या आणखी आहेत...