आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरफान खानची पहिली पुण्यतिथी:छोट्या पडद्यावर 'चाणक्य' बनून सुरु केला होता अभिनयाचा प्रवास, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत निर्माण केली होती स्वतःची वेगळी ओळख

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्याच चित्रपटातील सर्व सीन्स कापले गेले होते

बॉलिवूड इंडस्ट्रीतील हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांना या जगाचा निरोप घेऊन एक वर्षाचा काळ लोटला आहे. 29 एप्रिल 2020 हा दिवस चित्रपटसृष्टी आणि लाखो चाहत्यांसाठी दुःखाचा दिवस ठरला. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करणा-या इरफान खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. मिळणाऱ्या प्रत्येक भूमिकेचं सोनं कसं करायचं याचं कसब त्यांच्याकडे होतं. इरफान यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, जाणून घेऊया त्यांचा कसा राहिला अभिनयातील प्रवास...

छोट्या पडद्यावर केले होते पदार्पण

इरफान खान हे जयपूरजवळील टोंक जिल्ह्यातील रहिवाशी होते. एमएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1984 मध्ये त्यांनी अभिनेता होण्यासाठी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर अभिनयात करिअर करण्यासाठी इरफान मुंबईत आले. येथे आल्यानंतर त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि त्यांना 'चाणक्य', 'भारत एक खोज', 'सारा जहां हमारा', 'बनेगी अपनी बात' आणि 'चंद्रकांता'सारख्या बर्‍याच शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

पहिल्याच चित्रपटातील सर्व सीन्स कापले गेले
टेलिव्हिजनमध्ये करिअर करत असताना दिग्दर्शिका मीरा नायर यांनी त्यांना 'सलाम बॉम्बे'मध्ये कॅमिओ रोलची ऑफर दिली होती, परंतु चित्रपटातील त्यांची सर्व दृश्ये वगळण्यात आली होती. यानंतर इरफान यांनी 1990 मध्ये पंकज कपूर आणि शबाना आझमी स्टारर फिल्म 'एक डॉक्टर की मौत' या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटातील भूमिकेतून इरफान खान प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवू शकले नाहीत.

सर्वोत्कृष्ट खलनायकाचा मिळाला पुरस्कार

बर्‍याच फ्लॉप चित्रपटाचा भाग झाल्यानंतर इरफान यांना निगेटिव्ह भूमिका मिळू लागल्या. 2004 मध्ये आलेल्या 'हासिल' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांना 2007 मध्ये आलेल्या 'लाइफ इन ए मेट्रो' चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

दोन मुलांचा वडील आहेत इरफान

इरफान खान यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांच्यासोबत शिकलेल्या सुतपा सिकदरसोबत 1995 मध्ये लग्न केले होते. या दोघांना बाबिल आणि अयान ही दोन मुले आहेत. इरफान यांचा मोठा मुलगा बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बाबिलला लाँच करत आहे.

बातम्या आणखी आहेत...