आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आवाहन:इरफान खानचा मुलगा बाबिल म्हणाला, 'घराणेशाहीविरूद्ध आवाज उठवा पण सुशांतच्या नावाचा वापर करु नका'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्हाला घराणेशाहीविरूद्ध बंड करायचे असेल तर ते करा, पण कोणत्याही कारणास्तव सुशांतच्या नावाचा वापर करु नका, असे आवाहन बाबिलने केले आहे.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमागील कारणांबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच्या मृत्यूला बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीला जबाबदार धरले जात आहे. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांची फेरीही सुरू आहेत.

अशा परिस्थितीत सुमारे दोन महिन्यांपूर्वी वडील इरफान खानला गमावणा-या बाबिलने लोकांना एक आवाहन केले आहे. बाबिलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात त्याने  घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपले समर्थन दिले आहे, परंतु सुशांतच्या नावाखाली असे न करण्याचे आवाहन केले आहे.

घराणेशाहीवर बोलला बाबिल : बाबिलने इरफान खान आणि सुशांतचा फोटो शेअर केला केला आणि लिहिले, "हे सर्व अजूनही चालू आहे. आम्ही दोन अत्यंत प्रामाणिक आणि समजूतदार लोकांना गमावले आहे. सुशांतचे जाणे हे हृदयद्रावक आहे. स्वाभाविकच आपण कुणाला तरी याविषयी दोष देण्याचा प्रयत्न करीत आहोत जे खूप निराशाजनक आहे. कारण दुसर्‍याला दोष देऊन शांतता मिळवणे योग्य नाही. मी आपणा सर्वांना विनंती करतो की या दुर्दैवी घटनेसाठी कुणालाही दोष देऊ नका. मी तुम्हाला विनंती करतो की या घटनेच्या कारणांची चौकशी करणे थांबवा", असे बाबिल म्हणाला आहे. 

"त्यांच्या जाण्याने जे लोक दु:ख भोगत आहेत, त्यांच्यासाठी हे अधिक निराशजनक आहे. त्याऐवजी या लोकांच्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल आपण अधिक कौतुक करायला हवे. मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की, सुशांतच्या नावाचा वापर न करता योग्य गोष्टींसाठी  उभे रहा. तुम्हाला घराणेशाहीविरूद्ध बंड करायचे असेल तर ते करा, पण कोणत्याही कारणास्तव सुशांतच्या नावाचा वापर करु नका", असे आवाहन बाबिलने केले आहे. 

14 जून रोजी झाले निधन: सुशांतने 14 जून रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यावर उपचार घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. असे म्हटले जात की,  एकामागून एक सात चित्रपट हातून गेल्याने सुशांतने नैराश्यात येऊन आपले जीवन संपवले. अद्याप यासंदर्भात कोणताही पुरावा मिळालेला नसून पोलिस तपास करत आहेत.  

Advertisement
0