आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Irrfan Khan Birth Anniversary: Irrfan Could Not Become A Cricketer Due To Poverty, Did AC Repair Work During The Days Of Struggle, Then After Years Achieved Success With Talent

इरफान खानची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:इरफान खान यांना व्हायचे होते क्रिकेटर, संघर्षाच्या काळात सुपरस्टार राजेश खन्नांच्या घरी केले होते AC रिपेअरिंगचे काम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी-

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक इरफान खान यांची आज जयंती आहे. 30 वर्षे इंडस्ट्रीला अनेक उत्तम चित्रपट देणाऱ्या इरफान यांनी 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित इरफान यांना इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी बरीच वर्षे संघर्ष करावा लागला होता. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी-

नवाब घराण्यातून होते इरफान
इरफान खान राजस्थानमधील टोंक येथील नवाब घराण्यातून होते. त्यांचे बालपण टोंकमध्येच गेले. 7 जानेवारी 1967 मध्ये जन्मलेल्या इरफान यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. नशीबानेच ते अभिनय क्षेत्रात आला होता. क्रिकेटर व्हायची त्यांची इच्छा होती. पण त्यांनी फॅमिली बिझनेस सांभाळावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांची सीके नायडू ट्रॉफी अंडर 23 टीममध्ये निवड झाली होती. या टुर्नामेंटमध्ये उत्तम कामगिरी करणा-याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार होती. मात्र कुटुंबाचा पाठिंबा नसल्याने इरफान क्रिकेटर होऊ शकले नाही. त्यानंतर त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि येथूनच त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला.

वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्यांदा पडला होते प्रेमात
इरफान खान 16 वर्षांचा होते जेव्हा ते पहिल्यांदा दुधवाल्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होते. पण हे प्रेम त्यांना कायमचे मिळू शकले नाही. एका मुलाखतीत इरफान यांनी सांगितले होते की, वयाच्या 16 व्या वर्षी ते फक्त यासाठी दुध घ्यायला जायचा जेणेकरुन त्यांना त्या मुलीचा चेहरा बघता यावा. खास गोष्ट म्हणजे ती मुलगीही त्यांना पाहून हसायची. एक दिवस त्या मुलीने इरफानला तिच्या खोलीत बोलावले. तेव्हा इरफानने विचार केला की, आता काहीतरी घडणार आहे. पण मुलीने त्यांना तिची एक वही दिली, ज्यामध्ये एक पत्र ठेवले होते. हे पत्र मुलीने इरफानला तिच्या शेजारच्या मुलाला द्यायला सांगितले. त्यावेळी इरफान यांनी स्वत:ला हीरो समजले आणि आपल्या प्रेमाचे बलिदान देऊन मुलाला तिचे पत्र पोहोचवले होते. त्यानंतर ते दुःखात बुडाले होते. ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी दोन ते तीन आठवडे मुकेशची गाणी ऐकली होती.

राजेश खन्नांच्या घरी रिपेअर केला होता एसी
स्कॉलरशिपमधून इरफान NSD मध्ये अभिनयाचे शिक्षण घेत होते, त्यावेळी खर्च भागवण्यासाठी ते इलेक्ट्रिशियनचे काम करायचे. इलेक्ट्रिशियन असल्याने इरफान यांना एकदा राजेश खन्ना यांच्या घरी एसी ठिक करण्याचे काम मिळाले होते. पण राजेश खन्ना यांना भेटण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. कारण योगायोगाने त्या दिवशी राजेश खन्ना घरी नव्हते. पण राजेश खन्ना यांचे स्टारडम बघून इरफान दंग झाले होते.

पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच स्वप्न तुटले होते
इरफान खान यांचा पहिला चित्रपट 'सलाम बॉम्बे' होता. चित्रपटाची दिग्दर्शिक मीरा नायर यांनी इरफान यांना एका कॉलेज वर्कशॉपमध्ये पाहिले होते. मीराने त्यांना मुंबईतील एका कार्यशाळेत जाण्याची ऑफर दिली. इरफान यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 20 वर्षांचे इरफान मुंबईत आले आणि मीरा यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये रघुवीर यादव सोबत राहू लागले. चित्रपटाची कहाणी मुंबईच्या स्ट्रीट किड्सवर आधारित होती. इरफान यांना काही ख-या स्ट्रीट किड्ससोबत वर्कशॉपमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. कारण या चित्रपटात त्यांना एका स्ट्रीट किड सलीमची भूमिका देण्यात आली होती. मात्र शूटिंग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी मीराने इरफानची भूमिका कमी केली आणि त्यांना लेटर रायटरची भूमिका दिली, ज्या भूमिकेला प्रत्यक्षात काहीच महत्त्व नव्हते. यामुळे इरफान मित्र रघुवीर यादव आणि सूनी तारापोरवाला यांच्या खांद्यांवर डोके ठेवून खूप रडले होते. इरफान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "मला आठवतंय, जेव्हा मीराने माझी भूमिका कट केल्याचे मला सांगितले होते, तेव्हा रात्रभर मी खूप रडलो होतो."

जेव्हा अमेरिकेत 6 महिने घालण्यासाठी मिळाले होते फक्त 10 लाख रुपये मिळाले

'सलाम बॉम्बे' मधील भूमिकेनंतर मीराने त्यांना वचन दिले होते की, ती त्यांना तिच्या दुसर्‍या चित्रपटात मुख्य भूमिका देईल. पण ते पूर्ण करण्यासाठी त्याला 18 वर्षे लागली. मीराने त्यांना तिच्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'द नेमसेक' या चित्रपटात मुख्य भूमिका दिली होती. तोपर्यंत त्यांचा संघर्ष संपला नव्हता. ते चित्रपटाचे शूटिंग करत असताना मीरा नायरने त्यांना अमेरिकेत 6 महिने घालवण्यासाठी फक्त 10 लाख रुपये दिले होते.

इरफान यांना कधीच बॉलिवूड सोडण्याची इच्छा नव्हती

इरफान खान अशा अभिनेत्यांपैकी एक होते ज्याला बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्येही समान यश मिळाले. एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, ते कधी हॉलिवूडमध्ये कायमचे जाऊ शकतात का? त्यावर ते म्हणाले होते, "मी बॉलिवूडला कधीच सोडणार नाही. भविष्याने माझ्यासाठी काय जतन केले आहे हे मला माहित नाही. परंतु हॉलिवूडला माझा बेस बनवण्याचा माझा हेतू नाही. याचे एकमेव कारण म्हणजे मी माझ्या मनाचे ऐकून तिथे चित्रपट करु शकणार नाही. मला तेथे कुठलेही चित्रपट करण्यास भाग पाडले जाईल."

कधी सुतापाच्या प्रेमात पडले कळलेच नाही
अभिनयाचे बारकावे शिकत असताना कधी इरफान सुतापाच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळाले नाही. एकदा प्रॅक्टिस सेशनदरम्यान इरफानची नजर सुतापावर पडली. पहिल्याच नजरेत ती त्यांना आवडू लागली होती. सुतापा त्यावेळी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आर्ट आणि अॅक्टिंगचे धडे गिरवत होती. पण तिला अभिनयात नव्हे तर स्टोरी आणि स्क्रिनप्लेमध्ये रुची होती. दरम्यान इरफान आणि सुतापा यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नापूर्वी दोघांनाही एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्याकाळात लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपविषयी बोलतदेखील नव्हते. लग्न न करता एकत्र राहत असलेल्या इरफान-सुतापाच्या आयुष्यात जेव्हा तिस-या व्यक्तीची चाहुल लागली तेव्हा त्यांनी एक खोलीचे घर सोडून दोन खोल्यांचे घर शोधले. घर शोधण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विचारले जात होते, 'तुम्ही विवाहित आहात का?' यावर नाही उत्तर ऐकल्यानंतर घर दिले जात नव्हते. त्यानंतर दोघांनी 1995 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 1995 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले. इरफान यांनी सुतापाला म्हटले होते की, जर तिच्या कुटुंबीयांची इच्छा असेल तर मी हिंदु धर्म स्वीकारण्यास तयार आहे. परंतु याची गरज पडली नाही. सुतापाच्या घरच्यांनी त्यांना तसेच स्वीकारले.

बातम्या आणखी आहेत...