आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Irrfan Khan Death Anniversary: 'Angreji Medium' Co Star Radhika Madan Recalled Irrfan Saying 'used To Vomit But Never Let The Disease Effect During The Shot'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरफान खान यांची पुण्यतिथी:'अंग्रेजी मीडियम'ची को-स्टार राधिका मदान म्हणाली - 'सेटवर उलटी करायचे पण शॉटच्या वेळी कधीच आजारी असल्याचे जाणवू दिले नाही'

किरण जैन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राधिका सांगते - आपल्या आठवणी अविस्मरणीय आहेत, हे त्यांचे शेवटचे शब्द मला आठवतात

अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. इरफान यांचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मीडियममध्ये त्यांच्यासोबत काम करणारी अभिनत्री राधिका मदान हिने दिव्य मराठीसोबत बोलताना इरफान यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राधिका सांगते, पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना दुरुनच पाहत होते. त्यावेळी ते माझ्या वडिलांसारखेच आहेत, असे मला वाटले. हाच विचार मनात ठेऊन मी त्यांच्यासोबत पूर्ण चित्रपटाचे शूटिंग केले.

डिझायनरकडून ऐकायचे की, सेटवर येण्यापूर्वी इरफान सरांना उलटी झाली -
इरफान खान यांच्याविषयी राधिका पुढे सांगते, 'त्यावेळी ते आपल्या कॅन्सरचा उपचार (किमोथेरपी) करत होते. जेव्हा ते सेटवर यायचे तेव्हा त्यांच्यात ऊर्जा आणि सकारात्मकता दिसून यायची. माझ्या कॉश्च्युम डिझायनरकडून मला कळायचे की, इरफान सरांना सेटवर उलटी झाली. मात्र शॉट देताना कधीच कधीच ते आजारी असल्याचे त्यांनी जाणवू दिले नाही. काही मिनिटांपूर्वी त्यांच्यासोबत काय घडले, हे कुणाला कळायचे नाही.'

शूटिंगच्या शेवटच्या दिवसांत त्यांची तब्येत ठिक नव्हती
आपल्या शेवटच्या भेटीविषयी राधिका सांगते, 'शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सर्वांसोबत फोटो काढले. त्यांना लवकर घरी जायचे होते. त्यांना तेथे बरे वाटत नव्हते. ते घरी जाण्यासाठी गाडीत बसले तेव्हा मी त्यांना एक फोटो काढण्याची विनंती केली. तेव्हा ते मला म्हणाले, आपले तर खूप फोटो आहेत, आपल्या खूप चांगल्या आठवणी आहेत. फक्त एक स्माईल देऊन ते निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...