आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Irrfan Khan Death Anniversary: Irrfan Khan Was In Love With Milk Seller's Daughter At The Age Of Just 16, Had To Breakup Because Of Cousin

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिली पुण्यतिथी:वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्यांदा दुधवाल्याच्या मुलीच्या प्रेमात पडले होते इरफान, चुलतभावामुळे झाले होते ब्रेकअप

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इरफान यांनी स्वत: एका मुलाखतीत आपली अनोखी प्रेमकाहाणी कहाणी सांगितली होती.

अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांना या जगाचा निरोप घेऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय. 29 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. इरफान खान यांच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना ठाऊक नसतील. विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. उदाहरणार्थ, इरफान खान जेव्हा 16 वर्षांचे होते जेव्हा ते पहिल्यांदा दुधवाल्याच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. पण हे प्रेम त्यांना कायमचे मिळू शकले नाही. चुलतभावामुळे त्यांना त्या मुलीसोबत ब्रेकअप करावे लागले होते.

दुध घ्यायसाठी जायचे जेणेकरुन मुलीचा चेहरा दिसू शकेल
इरफान म्हणाले होते की, वयाच्या 16 व्या वर्षी ते फक्त यासाठी दुध घ्यायला जायचे जेणेकरुन त्यांना त्या मुलीचा चेहरा बघता यावा. खास गोष्ट म्हणजे ती मुलगीही त्यांना पाहून हसायची. एक दिवस त्या मुलीने इरफान यांना तिच्या खोलीत बोलावले. तेव्हा इरफानने विचार केला की, आता काहीतरी घडणार आहे. पण मुलीने त्यांना तिची एक वही दिली, ज्यामध्ये एक पत्र ठेवले होते. हे पत्र मुलीने इरफान यांना त्यांच्या शेजारच्या मुलाला द्यायला सांगितले. त्यावेळी इरफान यांनी स्वत:ला हीरो समजले आणि आपल्या प्रेमाचे बलिदान देऊन मुलाला तिचे पत्र पोहोचवले.

इरफान यांच्या घरी यायची ती मुलगी
इरफान यांनी या मुलाखतीत पुढे सांगितले होते की, ती मुलगी त्यांच्या घरी यायची आणि दोघे एकत्र लपाछुपीचा खेळ खेळायचे. इरफान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासाठी मुलीबरोबर घालवलेले हे क्षण स्वर्गसुखापेक्षा कमी नव्हते. पण इरफान यांच्या चुलतभावामुळे हे दोघे वेगळे झाले होते. मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, एक दिवस काकाचा मुलगा आला आणि त्यांना म्हणाला की, ती मुलगी त्याच्यासोबत लपाछुपी खेळली. मग काय इरफानला वाईट वाटले आणि त्यांनी त्या मुलीशी ब्रेकअप केले.

प्रेमभंगाच्या दुःखात दोन-तीन आठवडे ऐकली होती मुकेशची गाणी
इरफान यांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार, त्या मुलीशी ब्रेकअप झाल्यानंतर ते दुःखात बुडाले होते. ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर येण्यासाठी त्यांनी दोन ते तीन आठवडे मुकेशची गाणी ऐकली होती. याकाळात मुलीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते तिच्याशी बोलायला तयार झाले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...