आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरफानची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच भंगले होते इरफान खानचे स्वप्न, रघुवीर यादवच्या खांद्यावर डोके ठेऊन रात्रभर रडला होता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांच्या निधनाने खचलेल्या सौरभ शुक्लांना इरफानने आधार दिला होता

अभिनेता इरफान खानची आज बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. आज तो हयात असता तर त्याने वयाची 55 वर्षे पूर्ण केली असती. 29 एप्रिल 2020 रोजी त्याचे निधन झाले होते. इरफान असा एक अभिनेता होता जो मित्रांचा मित्र होता. त्याने संघर्ष पाहिला, परंतु मित्रांच्या मदतीसाठी त्याने कधीही पाठ फिरवली नाही. जाणून घेऊयात त्याच्या आयुष्याशी निगडीत काही खास किस्से...

  • पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच स्वप्न तुटले होते

इरफान खानचा पहिला चित्रपट 'सलाम बॉम्बे' होता. चित्रपटाची दिग्दर्शिक मीरा नायर यांनी इरफानला एका कॉलेज वर्कशॉपमध्ये पाहिले होते. मीराने त्याला मुंबईतील एका कार्यशाळेत जाण्याची ऑफर दिली. इरफानच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 20 वर्षांचा इरफान मुंबईत आला आणि मीरा यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये रघुवीर यादव सोबत राहू लागला.

चित्रपटाची कहाणी मुंबईच्या स्ट्रीट किड्सवर आधारित होती. इरफानला काही ख-या स्ट्रीट किड्ससोबत वर्कशॉपमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. कारण या चित्रपटात त्याला एका स्ट्रीट किड सलीमची भूमिका देण्यात आली होती. मात्र शूटिंग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी मीराने इरफानची भूमिका कमी केली आणि त्याला लेटर रायटरची भूमिका दिली, ज्या भूमिकेला प्रत्यक्षात काहीच महत्त्व नव्हते. यामुळे इरफान मित्र रघुवीर यादव आणि सूनी तारापोरवाला यांच्या खांद्यांवर डोके ठेवून खूप रडला होता. इरफानने एका मुलाखतीत सांगितले होते, "मला आठवतंय, जेव्हा मीराने माझी भूमिका कट केल्याचे मला सांगितले होते, तेव्हा रात्रभर मी खूप रडलो होतो."

  • वडिलांच्या निधनाने खचलेल्या सौरभ शुक्लांना इरफानने आधार दिला होता

अभिनेता सौरभ शुक्ला यांनी एका मुलाखतीत इरफान खानशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला होता. एनएसडीमध्ये इरफानचे ज्युनिअर राहिलेल्या सौरभ यांच्या म्हणण्यानुसार, भारतात जेव्हा मोबाइल फोन आला, तेव्हा त्यांच्या मित्रांच्या संपूर्ण ग्रुपमध्ये एकट्या इरफानकडेच फोन होता. सौरभ म्हणतात, "त्याच्या मोबाइलवर सर्व मेसेजेस येत असत. परंतु त्यामुळे तो कधीच चिडला नाही. मला तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्या घरुन मेसेज आला की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. ते एकून मी खूप खचून गेलो होतो. पण त्याने मला घट्ट धरून ठेवले आणि कुटुंबासाठी खचून चालणार नाही, असे म्हटले. त्या दिवसांत आमच्याकडे पैसेही नसायचे. पण इरफानने विमानतळावर जाऊन माझ्यासाठी विमानाचे तिकीट विकत घेतले."

  • जेव्हा अमेरिकेत 6 महिने घालण्यासाठी मिळाले होते फक्त 10 लाख रुपये मिळाले

'सलाम बॉम्बे' मधील भूमिकेनंतर मीराने त्याला वचन दिले की, ती त्याला तिच्या दुसर्‍या चित्रपटात मुख्य भूमिका देईल. पण ते पूर्ण करण्यासाठी त्याला 18 वर्षे लागली. मीराने त्याला तिच्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'द नेमसेक' या चित्रपटात मुख्य भूमिका दिली होती. तोपर्यंत त्यांचा संघर्ष संपला नव्हता. तो चित्रपटाचे शूटिंग करत असताना मीरा नायरने त्याला अमेरिकेत 6 महिने घालवण्यासाठी फक्त 10 लाख रुपये दिले होते.

  • अमेरिकन सीरिज 'इन ट्रीटमेंट'च्या प्रत्येक सीनपूर्वी रडायचा इरफान

इरफान खानने 2008-2010 दरम्यान अमेरिकन टीव्ही सीरिज 'इन ट्रीटमेंट' मध्ये काम केले होते. झुम्पा लाहिरी यांच्या कथेवर आधारित या मालिकेत ब्रूकलिनमधील बंगाली विधवेची थेरपी दाखवली होती. इरफान याच्या प्रत्येक सीनपूर्वी रडायचा. त्याला पानच्या पानं संवाद पाठ करावे लागायचे. एक वेळ अशी आली की त्यांनी नाटक करणे बंद केले. जर एखादा अभिनेता दोन ओळी देखील विसरला तर त्याला पुढील पर्याय म्हणून 15 मिनिटांचा टेक दिला जायचा. निराश झालेल्या इरफानने न्यूयॉर्कमध्ये असलेला आपला मित्र नसीरुद्दीन शाह यांना फोन लावला आणि उत्तर मिळाले की, यश मिळवण्याचे सोपे सूत्र हेच आहे की, आपले संवाद योग्य पद्धतीने पाठ करावे."

बातम्या आणखी आहेत...