आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरल्या फक्त आठवणी:भिंतीवर इरफान खानचे पेंटिंग बघून भावूक झाली लंचबॉक्स फेम अभिनेत्री निरमत कौर, म्हणाली - येथून जवळच साजन फर्नांडिजचे घर आहे 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्ट वर्क तयार होईपर्यंतचे अनेक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आल्या आहेत.

अभिनेता इरफान खानचे गेल्या महिन्यात 29 एप्रिल रोजी निधन झाले होते. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टचे कलाकार रंजीत दाहिया यांनी एका घराबाहेरील भिंतीवर त्याचे म्युरल आर्ट बनवले आहे. या म्युरल आर्टचे छायाचित्र लंचबॉक्स या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री निमरत कौर हिने तिच्या ट्विटर हँडल अकाऊंटवर शेअर केले आणि लिहिले - कुणी विचार केला होता, जीवन आणि कलेचा असा अशुभ आणि आतापर्यंत साजरा केलेला संगम... 

'लंचबॉक्स' कनेक्शन

निमरतने छायाचित्र शेअर करुन लिहिले पुढे लिहिले की, लंचबॉक्स या चित्रपटात इरफान खानने साकारलेले पात्र साजन फर्नांडिजचे घर येथूनच काही अंतरावर आहे. हे घर वरोडा रोल वांद्रा वेस्टस्थित रनवार गावात आहे. यापूर्वी या भिंतीवर मांझी या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्धीकीच्या पात्राचे म्युरल आर्ट बनवण्यात आले होते. 

कलाकारांनी शेअर केले अनेक व्हिडिओ

हे आर्ट वर्क बनवतानाचे अनेक व्हिडिओ रंजीत दाहिया आणि विकास बन्सल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...