आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Irrfan Khan Was The First Choice Of Makers For 'Sardar Uddhaam', Not Vicky Kaushal, The Makers Changed The Decision Due To The Actor's Illness

सरदार उधम:विकी कौशल नव्हे तर इरफान खान होते 'सरदार उधम'साठी निर्मात्यांची पहिली पसंती, इरफानच्या आजारपणामुळे निर्मात्यांनी बदलला होता निर्णय

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुजित 20 वर्षांपासून या विषयावर संशोधन करत होते

अभिनेता विकी कौशल स्टारर सरदार उधम हा चित्रपट येत्या 16 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे. चित्रपटात विकी सरदार उधमच्या भूमिकेत दिसणार आहे. शूजित सरकार यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर रॉनी लाहिरी निर्माते आहेत. अलीकडे निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित काही खास आणि मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.

'सरदार उधम'साठी इरफान खानला होती पहिली पसंती
जेव्हा या चित्रपटाचे काम सुरू झाले, तेव्हा सरदार उधम सिंहचे पात्र साकारण्यासाठी निर्मात्यांच्या मनात पहिले नाव दिवंगत इरफान खानचे होते. निर्मात्यांना त्याला चित्रपटात कास्ट करायचे होते, पण त्याच्या आजारपणामुळे आणि उपचारामुळे निर्मात्यांनी निर्णय बदलला आणि विकी कौशलला कास्ट करण्याचा घेतला.

शुजित 20 वर्षांपासून या विषयावर संशोधन करत होते
शुजित सरकार 20 वर्षांपूर्वी जालियनवाला बागला गेले होते. येथे येऊन ते इतके प्रभावित झाले की त्यांनी ग्रंथालयांमध्ये जाऊन कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात केली. ते सांगतात, मी मुंबईत एका पॅशनने चित्रपट बनवायला आलो होते. सरदार उधम सिंहप्रमाणे मी सुद्धा 21 वर्षे वाट पाहिली. माझे जे काही भाव होते, ते मी चित्रपटात ठेवले आहेत.

सेट तयार करणे खूप कठीण होते
हा चित्रपट 1919 ते 1940 च्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत निर्मात्यांना ब्रिटिशांचे राज्य असलेल्या भारताचा सेट तयार करणे कठीण काम होते. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यासाठी, ब्रिटिश राजवटीच्या उंच इमारतींपासून ते विंटेज कार, कोळशावर चालणाऱ्या ट्रेन तयार करण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...