आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दुबई रिटर्न':पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार इरफान खान, आतापर्यंत रिलीज न झालेल्या चित्रपटाचा वांद्रे फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमिअर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 29 एप्रिल 2020 रोजी झाले होते इरफानचे निधन

बॉलिवूड अभिनेता इरफान खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. 2005 मध्ये तयार झालेला मात्र अद्याप रिलीज न झालेला इरफानचा दुबई रिटर्न हा चित्रपट लवकरच त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. वांद्रा फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर होणार आहे.

खरं तर 2005 मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले होते. मात्र हा चित्रपट त्यानंतर सिनेगृहांमध्ये प्रदर्शित झाला नाही. आदित्य भट्टाचार्य यांनी दिग्दर्शित केलेला हा एक कॉमेडी चित्रपट असून यात इरफान खानने एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. विनय चौधरी यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. दुबई रिटर्नमध्ये इरफानने साकारलेल्या पात्राचे नाव आफताब अंग्रेज असून तो एक गँगस्टर असतो. याच फेस्टिव्हलमध्ये आदित्य भट्टाचार्य यांचा राख हा आणखी एक चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे.

वांद्रा फिल्म फेस्टिव्हलच्या समितीत अभय देओलचा समावेश
यंदाच्या वर्षीच बांद्रा फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच BFF ची घोषणा करण्यात आली आहे. हा फेस्टिव्हल कारवां आणि यूट्यूब यांच्यातील एक कोलेबरेशन आहे. हा प्लॅटफॉर्म याचवर्षी फेब्रुवारीत लाँच करण्यात आला होता. अभिनेता अभय देओल आणि चित्रपट समीक्षक असीम छाबडा या फेस्टिव्हलच्या समितीत सहभागी झाले आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये इरफान खानचा ‘दुबई रिटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा इरफान खानला पडद्यावर भेटण्याची संधी मिळणार आहे.इरफानचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ हा होता. यात इरफानसोबत करीना कपूर, राधिका मदान, दीपक डोबरियाल, डिंपल कपाडिया, कीकू शारदा मुख्य भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केला होता.

29 एप्रिल 2020 रोजी झाले होते इरफानचे निधन
गेल्या वर्षी 29 एप्रिल रोजी इरफान खानचे वयाच्या 53 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले होते. कोलनच्या संसर्गामुळे त्याला एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इरफानने दोन वर्षे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज दिली होती. त्याच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत. इरफानने 'मकबूल', 'लाइफ इन ए मेट्रो', 'द लंच बॉक्स', 'पीकू', 'तलवार' आणि 'हिंदी मीडियम' यासारख्या उत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याला 'हासिल' (निगेटिव्ह रोल), 'लाइफ इन ए मेट्रो' (बेस्ट अ‍ॅक्टर), 'पानसिंग तोमर' (बेस्ट अ‍ॅक्टर क्रिटिक) आणि 'हिंदी मीडियम' (बेस्ट अ‍ॅक्टर) यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 'पानसिंग तोमर' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...