आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरफानचा शेवटचा चित्रपट:'अंग्रेजी मीडियम' नव्हे, 'द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स' असेल चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा इरफान खानचा शेवटचा चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इरफानचा शेवटचा चित्रपट.. साँग ऑफ स्कॉर्पिअन्स

अभिनेता इरफान खानला या जगाचा निरोप घेऊन नऊ महिने लोटले आहेत. त्याच्या अभिनयाने सजलेला 'द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स' हा अखेरचा चित्रपट आता पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. खरं तर हा चित्रपट इरफानचा शेवटचा प्रोजेक्ट नव्हता. पण बरीच वर्षे हा चित्रपट प्रदर्शनच्या प्रतीक्षेत होता. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील थिएटरमध्ये रिलीज होणारा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या 70 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर झाला होता.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित अपडेट शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, “इरफानचा शेवटचा चित्रपट.. साँग ऑफ स्कॉर्पिअन्स – 2021 मध्ये प्रदर्शित होणार.”

चित्रपटाशी संबंधित खास गोष्टी
'द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स' या चित्रपटात इरफान खानने एका व्यापाराची भूमिका साकारली आहे. इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान आणि शशांक अरोरा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अनूप सिंह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा नूरा नावाच्या एका मुलीभोवती फिरते. ती आपल्या आजीकडून स्कॉर्पिअन सिंगिंग शिकत असते. तर इरफान उंट विक्रेत्याच्या भूमिकेत असून तो नूराच्या प्रेमात पडतो.

'अंग्रेजी मीडियम' होता शेवटचा चित्रपट

इरफानने 2019 मध्ये आजारातून बरे होत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. हा चित्रपट मार्च 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात करीना कपूर, दीपक डोबरियाल, राधिका मदन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. निधनाच्या दोन दिवसांपूर्वी वीकनेसमुळे इरफान बाथरुममध्ये पडला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला कोलेन इंफेक्शन झाले होते. उपचारादरम्यान 29 एप्रिल रोजी त्याची प्राणज्योत मालवली होती.

इरफान खानचे निवडक चित्रपट आणि सन्मान
इरफानने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. फक्त भारतच नाही तर जगभरात इरफान खानचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. इरफानने फक्त हिंदी नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. इरफानने छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मेहनतीच्या जोरावरच त्याने यश मिळवले होते. 'मकबूल', 'लाइफ इन अ मेट्रो', 'द लंच बॉक्स', 'पीकू', 'तलवार' आणि 'हिंदी मीडियम' या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला होता. त्याला 'हासिल' (निगेटिव्ह रोल), 'लाइफ इन अ मेट्रो' (बेस्ट अॅक्टर), 'पान सिंह तोमर' (बेस्ट अॅक्टर क्रिटिक) आणि 'हिंदी मीडियम' (बेस्ट अॅक्टर) साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 'पान सिंह तोमर'साठी त्याने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली होती. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...