आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तला कॅन्सर:इरफानचा मुलगा बाबिल संजूला म्हणाला टायगर, लिहिले - वडील आजारी पडले तेव्हा संजय आमच्या मदतीसाठी सर्वात आधी आले होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबिलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून संजय दत्तच्या आजाराविषयी तर्क न लावण्याची विनंती केली आहे.

दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिलनुसार, संजय दत्त त्या लोकांपैकी एक आहे, जे त्याच्या वडिलांच्या आजारपणात आणि वारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी सर्वात आधी धावून आले होते. बाबिलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यासोबतच त्याने इरफान आणि संजय दत्त यांचा एक फोटोदेखील टाकला आहे.

  • संजूबाबा फिट होऊन येईल

बाबिलने लिहिले... सुरुवात कुठून करावी, असा विचार लेखक करत असतील. मात्र मी लेखक नाही. त्यामुळे येथूनच सुरुवात करतो. मी माध्यमांना विनंती करतो की, संजूबाबा आणि त्यांच्या कुटुंबा वेळ द्या, जेणेकरुन ते कोणतेही टेन्शन घेता उपचार करतील. मला माहीत आहे, तुम्ही तुमचे काम करत आहात. मात्र मानवतेच्या नात्याने आपल्याला ते करायला हवे. हे एक सिक्रेट आहे. संजूभाई त्या लोकांपैकी एक आहे, जे बाबा (इरफान) यांना कॅन्सर झाल्याचे कळताच ते आमच्या मदतीसाठी सर्वात अाधी आले होते आणि वारल्यानंतरही ते आमच्यासोबत ठामपणे उभे होते. मी विनंती करतो, त्यांना ही लढाई लढू द्यावी. मी संजय दत्त यांच्याविषयी बोलत आहे. ते टायगर आहेत, फायटर आहेत. संजूबाबा पुन्हा एकदा फिट होऊन परत येतील, असा विश्वास मला आहे.

  • 29 एप्रिल रोजी झाले होते इरफानचे निधन

इरफान खान यांचा मृत्यू 29 एप्रिल रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये झाला होता. ते जवळजवळ दोन वर्षे न्यूरो इंडोक्राइन नावाच्या कँसरशी लढा देत होते. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडिया’ ठरला. तो त्यांच्या मृत्यूच्या दीड महिन्याआधी 13 मार्च रोजी रिलीज झाला होता.

  • संजय दत्तवर मुंबईत उपचार सुरु

संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्याचे म्हटले जात आहे. लीलावती हॉस्पिटलचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितल्यानुसार, संजय दत्तने अमेरिकेतील डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन घेतले आणि त्यानंतर त्याने देशाबाहेर जाण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. सध्या मुंबईतच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

  • पत्नी मान्यता दत्तने निवेदन जारी करुन दिली होती माहिती

संजय दत्त, फुफ्फुसाच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी देशाच्या बाहेर जाणार नसून सुरुवातीचे उपचार मुंबईतच होणार असल्याचे संजयची पत्नी मान्यता दत्तने एका निवेदनातून सांगितले होते. यापूर्वी संजय पत्नी आणि बहीण प्रियासोबत कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला होता. तेथे संजूने छायाचित्रकारांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. मान्यताने निवेदनात लिहिले होते, संजूच्या सर्वच चाहते आणि शुभचिंतकांचा मी आभार व्यक्त करू शकत नाही. आपल्या जीवनात संजूने बरेच चढ-उतार पाहिले. मात्र ज्या गोष्टीने त्याला दिलासा दिला ते तुमचे प्रेम आणि सहकार्य होते. आम्ही आज ज्या परिस्थितीत आहोत त्यासाठी तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करते. ही दीर्घ लढाई आणि प्रवास आहे. संजूसाठी सकारात्मक राहून विचार करावा लागणार आहे. या काळात विलगीकरणामुळे मी संजूसोबत रुग्णालयात राहू शकत नाही. प्रियाने दोन दशकांपासून कुटुंबाने चालवलेल्या कॅन्सर फाउंडेशनसोबत काम केले आहे. त्यांनी आपल्या आईला त्या आजाराशी लढताना पाहिले आहे. तीच या लढाईत आमची मशाल घेऊन उभी आहे, तर किल्ला मी सांभाळणार आहे. लोक सतत विचारत आहेत, संजूचा उपचार कुठे करणार आहे. त्यांना मी संागू इच्छित आहे की, आम्ही मुंबईतच उपचार करणार आहोत. कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आम्ही पुढची योजना आखणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...