आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावनिक क्षण:दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा पुरस्कार स्विकारण्यासाठी मुलगा बाबीलने घातले त्यांचे कपडे; म्हणाला, किमान त्यांच्या कपड्यांमध्ये फिट होऊ शकतो

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयुष्मान खुराना यांनी बाबील पहिल्यांदा घेतली भेट

भारतीय बॉलीवुडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांची नुकतेच 'इंग्लीश मीडियम'चा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली. हा पुरस्कार त्यांना 66 फिल्मफेअर अर्वाड्सच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांचा मुलगा बाबीलने इरफान खानचे कपडे घातले होते. बाबीलने यांचा व्हिडियो सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. आणि त्यावर "त्यांची आई आणि इरफान खानची पत्नी सुतापा सिकदर यांनी पुरस्कार सोहळ्याला का अनुपस्थित राहल्या हे देखील सांगितले आहे."

किमान 'या' कपड्यांमध्ये फिट येऊ शकतो
बाबीलने आपल्या सोशल मीडियावरील व्हिडियोमध्ये लिहले आहे की, "माझी आई मला तयार करत आहे. लोक प्रत्येक वेळी सांगतात की, तु तुझ्या वडिलांच्या शूजमध्ये फिट बसू शकत नाही. परंतु, मी त्यांच्या कपड्यांमध्ये फिट असू शकतो. परंतु, मला मिळलेल्या प्रेमामुळे प्रेक्षकांचे आणि इंडस्ट्रीचे आभार व्यक्त करायचे होते."

आयुष्मान खुराना यांनी बाबील पहिल्यांदा घेतली भेट
अभिनेता आयुष्मान खुराना यांनी 66 फिल्मफेअर अवार्ड दरम्यान अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील यांची पहिल्यांदा भेट घेतली. त्यांनी सोशल मीडियावर एक खूप जूना फोटो शेअर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...