आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. त्याचा मोठा मुलगा बाबिल आपल्या वडिलांच्या आठवणीत त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतोय. बाबिलने आपल्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काही व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इरफान एका डोंगराळ भागात पाण्यात पोहताना दिसतोय. जेव्हा इरफान पोहून बाहेर येतो, तेव्हा हे बर्फाळ पाणी आहे असे म्हणतो. बॅकग्राऊंडमध्ये एका महिलेचा हसतानाचा आवाज ऐकू येतोय.
सेलिब्रिटींनी दिली प्रतिक्रिया: बाबिलने या व्हिडिओसह कॅप्शन लिहिले नाही, परंतु व्हिडिओ पाहिल्यानंतर हा त्यांच्या एका जुन्या व्हेकेशनचा असल्याचे दिसते. बाबिलने पोस्ट केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला. ईशान खट्टर, अनूप सोनी या कलाकारांनी व्हिडिओवर हृदयाची इमोजी बनवून आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिनेता विपिन शर्मा यांनी कमेंटमध्ये लिहिले की, इरफानला पोहायला खूप आवडायचे. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या वेळी जेव्हा आम्ही फिल्म सिटीमध्ये होतो, तेव्हा इरफानने तलावामध्ये पोहण्यासाठी उडी मारली आणि मी बाहेर त्याच्याशी बोलत होतो.
29 एप्रिल रोजी निधन: इरफानने 29 एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला तेथे दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
इरफानला न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर होता: मार्च 2018 मध्ये इरफान खान न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमरच्या उपचारासाठी लंडनला गेला होता. तेथे तो जवळपास वर्षभर राहिला आणि बरे झाल्यानंतर एप्रिल 2019 मध्ये भारतात परतला. परत आल्यानंतर त्याने राजस्थानमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि त्यानंतर पुढील वेळापत्रकांसाठी लंडनला गेला, तिथेही तो डॉक्टरांच्या संपर्कात राहिला. त्यानंतर तो अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला गेला. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील रद्द करण्यात आली. त्यामुळे तो मुंबईबाहेर जाऊ शकला नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.