आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टारकिडचे पदार्पण:अनुष्का शर्माच्या चित्रपटातून डेब्यू करणार दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील, सेटवरुन समोर आला पहिला फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे पहिले शेड्यूल गुलमर्ग येथे नुकतेच पूर्ण झाले आहे.

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय. अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून बाबीलचे पदार्पण होत आहे. अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाऊस 'क्लीन स्लेट फिल्म्स'ने पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 'काला' हे या चित्रपटाचे नाव असून हा एक थ्रिलरपट असेल.

या चित्रपटात बाबीलची मुख्य भूमिका असून 'बुलबुल' चित्रपटात झळकलेली तृप्ती डिमरी त्याच्यासह झळकणार आहे. तर अन्विता दत्त या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री स्वस्तिक मुखर्जीदेखील 'काला'मध्ये बाबील आणि तृप्ती यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

यापूर्वी बाबीलने 2017 मध्ये आलेल्या वडील इरफान खानच्या 'करीब करीब सिंगल' या चित्रपटासाठी कॅमेरा असिस्टंट म्हणून काम केले होते. बाबील आणि तृप्तीने त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले असून पहिले शेड्यूल त्यांनी गुलमर्ग येथे नुकतेच पूर्ण केले आहे. नुकताच चित्रपटातील सेटवरील एक फोटो समोर आला आहे.

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खानला जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला तेव्हा बाबील हा पुरस्कार स्वीकारताना भावुक झाला होता. मागील महिन्यातही बाबीलने तो फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करत असल्याची हिंट दिली होती. मात्र तो याविषयी जास्त काही बोलला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...