आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:‘इरफान आपल्या कॅन्सरवरील उपचाराचा अनुभव चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे सांगायचा’, विशाल भारद्वाज यांनी सांगितल्या इरफान खानच्या आठवणी 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशाल भारद्वाज यांनी सांगितले, इरफान आपल्या आजाराकडे फिल्मी पद्धतीने पाहायचा.

इरफानसोबत बऱ्याच चित्रपटांत काम केलेले दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले. ‘इरफान म्हणायचा, ‘त्याची प्रकृती म्हणजे कधी विनोदी तर कधी थरारक अशा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटासारखी आहे.’ त्यांनी पुढे सांगितले की, इरफान आपल्या आजाराकडे फिल्मी पद्धतीने पाहायचा.

‘मकबूल’, ‘7 खून माफ’ आणि ‘हैदर’ सारख्या चित्रपटात इरफानसोबत काम केलेल्या विशालला तो क्षण आठवला ज्यावेळी ‘हैदर’चित्रपटात इरफानचे पात्र रूहदारला दफन केले जात होते. विशाल भावनिक होऊन म्हणाला की, ‘मला असे वाटते की, माझ्या आयुष्यातील इरफानच्या मृत्यूचा हा क्षण एडिट व्हावा.’ विशाल, इरफान आणि दीपिका पदुकोणसोबत गँगस्टरवर आधारित चित्रपटासाठी प्लॅन करत होते. परंतु इरफानच्या आजारपणामुळेे विशालचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरूच होऊ शकला नाही.

इरफानच्या आठवणीत विशालने लिहिले, ‘2018 मध्ये मी आणि तब्बू, इरफानला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो. तो त्याच्या कॅन्सरच्या उपचाराबाबत एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे सांगत होता. तो इतके मजेशीर सांगत होता की, मी आणि तब्बू हसत होतो. त्याने डॉक्टर्स आणि त्यांच्या विचित्र सवयींबाबतही सांगितले. त्यावेळी त्याची पत्नी म्हणाली, डॉक्टरांची टर उडवू नये. मग इरफान सांगू लागला की, त्याची प्रकृती म्हणजे कधी विनोदी, तर कधी थरारक अशा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटासारखी आहे.’

बातम्या आणखी आहेत...