आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • IrrfanKhan Gets Honored At Producers Guild Of America Awards, ,Irrfan Khan Gets Honoured At Producers Guild Of America Awards 2021, But They Majorly Goof Up His Name News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेमध्ये इरफानची आठवण:'प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका' या पुरस्काराने दिवंगत अभिनेता इरफान खान सम्मानित; परंतु, रंगमंचवार चुकीचे पुकारले गेले नाव

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इरफानने हॉलीवुडमधील भरपुर चित्रपटात केले होते काम

'प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका' या पुरस्काराचे मानकरी नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे दिवंगत अभिनेता इरफान खान सह इतर दोन हॉलीवुड अभिनेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारातील मानकऱ्यांना मेमोरियम सेगमेंटदरम्यान सम्मानित करण्यात आले होते. परंतु, संमारंभामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान यांचे नाव चुकीचे घेतले गेले असून त्यांना इरीफ खान या नावाने वाचले गेले. विशेष म्हणजे यामध्ये हॉलीवुड अभिनेता किर्क डगलस (ज्यांचे गेल्या वर्षी 103 वर्षी निधन झाले होते) आणि चॅडविक बोसमॅन (ज्यांनी गेल्या वर्षी वयाच्या 43 वर्षी जग सोडले होते) यांनादेखील स्मरण केले गेले.

इरफानने हॉलीवुडमधील भरपुर चित्रपटात केले होते काम
दिवंगत अभिनेता इरफान खान हा बॉलिवूड अभिनेता होता. परंतु, त्याने हॉलीवूड चित्रपटांतदेखील आपली चांगली ओळख निर्माण केली होती. हॉलीवुडमधील 'द अमेझिंग स्पायडर मॅन', 'लाइफ ऑफ पाय', 'इन्फर्नो', 'जुरासिक वर्ल्ड' आणि 'पजल' यांचा समावेश असून त्यांचे दोन चित्रपट 'सलाम बॉम्बे' आणि 'द लंच बॉक्स' भारताकडून ऑस्करमध्ये पाठवण्यात आले होते.

गेल्या वर्षी झाले होते इरफानचे निधन
भारताचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा वयाच्या 53 व्या वर्षी कोलोनच्या संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांना मार्च 2018 मध्ये न्यूरो-एंडोक्राईन या बिमारीचे निदान झाले असून ते मृत्यू होईपर्यंत त्यावर उपचार घेत होते. विशेष म्हणजे त्यांच्या 'पान सिंह तोमर' या चित्रपटाला नॅशनल अवार्ड मिळाला होता. आणि भारत सरकाराकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारदेखील दिला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...