आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

77 वर्षीय अमिताभ बच्चन यांचे कामाविषयीचे समर्पण:बिग बींनी रविवारी केले 7 चित्रपटांचे चित्रीकरण, ब्लॉगमध्ये लिहिले- कामासाठीचा सर्वोत्तम दिवस, जेव्हा सर्वजण विश्रांती घेत असतात

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंगचा हा फोटो अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये शेअर केला आहे.
  • अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शूटचा फोटो शेअर केला आणि लिहिले- मी आधीच थकलोय...
  • 'केबीसी 12' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या अमिताभ यांनी शनिवारी कर्मवीर स्पेशल एपिसोडचे चित्रीकरण केले.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी रविवारी एक दोन नव्हे तर तब्बल सात चित्रपटांसाठी चित्रीकरण केले. यापैकी 4 फुल लेन्थ आणि 3 शॉर्ट फिल्म्स आहेत. 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी स्वतः ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबतच त्यांनी लिहिले, "कामासाठी सर्वात चांगला दिवस, जेव्हा इतर सर्वजण आराम करत असतात. रविवार. 4 चित्रपट, 3 शॉर्ट फिल्म, 6 क्रोमा शूट, 2 स्टिल सेट. होय."

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये चित्रीकरणाशी संबंधित काही स्टील शेअर केल्या आहेत आणि लिहिले - मी आधीच थकलोय...

  • लवकरच केबीसी 12 मध्ये दिसणार आहेत अमिताभ

अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' च्या 12 व्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. लवकरच हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित केला जाईल. यावेळी शोची टॅगलाइन आहे,"हर चीज को ब्रेक लग सकता है, सपनों को नहीं". शनिवारी बिग बींनी या कार्यक्रमाचा कर्मवीर स्पेशल एपिसोड शूट केला.

  • या चित्रपटांमध्ये बिग बी दिसणार आहेत

बिग बींच्या चित्रपटांविषयी सांगायचे म्हणजे ते शेवटचे 12 जून रोजीअॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या 'गुलाबो सीताबो'मध्ये दिसले होते. 'चेहरे', 'ब्रह्मास्त्र', 'बटरफ्लाय' आणि 'झुंड' हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत.