आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चांना उधाण:पूनम पाडे सहा आठवड्यांची गर्भवती?, स्वतः सांगितले प्रेग्नेंसीच्या व्हायरल बातमीमागचे सत्य

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर वरखा प्रभुगावकर यांनी पूनम सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे म्हटले होते.

गोव्याच्या समुद्र किनारी अश्लिल व्हिडिओ आणि फोटोशूट केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे चर्चेत होती. याप्रकरणी तिला अटक आणि नंतर जामिनावर सुटका झाली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि यावेळी ती प्रेग्नेंट असल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टर वरखा प्रभुगावकर यांनी पूनम सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पूनमच्या प्रेग्नेसीच्या चर्चा रंगल्या आहेत.

पूनम सध्या फोटोशूटसाठी पती सॅम बॉम्बेसोबत गोव्यात आहे. एका प्रसिद्ध वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पूनमने तिच्या गरोदर असण्या संदर्भातल्या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले आहे. 'मी गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत, या सर्व अफवा असून जेव्हा गूड न्यूज असेल तेव्हा मी स्वत: चाहत्यांसोबत शेअर करेन', असे पूनमने म्हटले आहे.

गोव्यात झाली होती नव-यासोबत अटक
पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला. पूनम सप्टेंबर महिन्यात गोव्यात गेली होती. तिथे तिने धरणावर फोटो शूट केले होते. या वादग्रस्त फोटो शूट प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल झाला आहे.

पूनमने जिथे व्हिडिओ शूट केला ते धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. स्थानिक विरोधी पक्ष गोवा फॉरवर्डने केलेल्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. या व्हिडिओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाने संताप व्यक्त केला. भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असा सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली होती. गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली. "आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन व ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटले जाते. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.

हनीमूनच्या वेळी पतीने मारहाण केल्याचा केला होता आरोप
पूनम गोव्यात हनीमूनसाठी गेली होती. त्याचवेळी तिने हा व्हिडिओ शूट केल्याचे सांगितले जाते. गोव्यातच हनीमूनच्या वेळी पती सॅम बॉम्बेने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप पूनमने केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती, त्यानंतर पोलिसांनी सॅमला ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर पूनम आणि सॅम बॉम्बे यांनी सामंजस्याने हा वाद मिटवला होता. सॅमबरोबरच्या आपल्या नात्यावर बोलताना पूनमने एका मुलाखती सांगितले होते की, आम्ही पुन्हा एकदा एकत्र आहोत.

बातम्या आणखी आहेत...