आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही इंडस्ट्रीतून दुःखद बातमी:'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संगीता यांनी छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले होते.

टीव्ही इंडस्ट्रीतून आज एक दुःखद बातमी आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. 25 ऑगस्ट रोजी कोकिलाबेन रुग्णालयात संगीता यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे वृत्त ‘टेलीचक्कर’ने दिले आहे.

संगीता यांना गेल्या काही दिवसांपासून वस्क्यूलिटिस (vasculitis) चा त्रास असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगितले गेले आहे. संगीता यांनी छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'तुम साथ हो जब अपने', ‘थपकी प्यार की’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ आणि ‘भंवर’, 'प्यार तुने क्या कियां' या मालिकांमध्ये काम केले होते.

2020 हे वर्ष बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी अतिशय दुःखदायक ठरले आहे. अनेक कलाकारांचे आजाराने निधन झाले, तर काहींनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. काही दिवसांपूर्वीच संगीता श्रीवास्तव यांचा ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ मालिकेतील को-स्टार समीर शर्माने मुंबईतील मालाड स्थित राहत्या घरी आत्महत्या केली होती. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट पोलिसांना मिळाली नव्हती.