आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसाबेल कैफचा फर्स्ट लूक आला समोर:कतरिना कैफच्या धाकट्या बहिणीची बॉलिवूडमध्ये एंट्री, पुलकित सम्राटसोबत झळकणार 'या' चित्रपटात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफची धाकटी बहीण इसाबेल कैफची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली आहे. आगामी ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटात इसाबेल अभिनेता पुलकित सम्राटसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

या चित्रपटात पुलकित दिल्लीच्या एका मुलाच्या भूमिकेत आहे. तर इसाबेल आगरा येथील नूरच्या भूमिका साकारणार आहे. याविषयी पुलकित सांगतो, ‘आमची केमिस्ट्री खूपच धमाकेदार आहे. आमची जोडी खूपच छान दिसते असे सेटवरील लोक म्हणतात. दोघांनी नुकतेच एक गाणे शूट केले आहे. यात 400 बॅकग्राउंड डान्सर्स पारंपरिक पोशाखात डान्स करताना दिसणार आहेत.' अलीकडेच पुलकितने चित्रपटाच्या सेटवरील इसाबेलसोबतची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे गाणे गणेश आर्चाय यांनी कोरिओग्राफ केले आहे.

‘सुस्वागतम खुशामदीद’चे सध्या मुंबईत चित्रीकरण सुरु आहे. हा एक रोमँटिक धाटणीचा चित्रपट असून यातून सामाजिक संदेशही देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. धीरज कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक असून इनसाइट इंडिया आणि एंडमोल शाइन इंडियाने यलो आंट प्रॉडक्शन्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...