आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपच्या वृत्तावर ईशान खट्टरने सोडले मौन:अनन्या पांडेसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली, म्हणाला - ती अजूनही तितकीच गोड आहे

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी आणि कतरिना कैफ पाहुणे म्हणून सहभागी झाले. शो दरम्यान करणने तिन्ही सेलिब्रिटींच्या अनेक रहस्यांवरुन पडदा उचलला. यादरम्यान करणने ईशानला त्याच्या आणि अनन्या पांडेच्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारले. ईशाननेही दुजोरा देत तो आणि अनन्या आता वेगळे झाल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी कधीही ईशान किंवा अनन्या यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत वक्तव्य केले नव्हते. परंतु करणच्या शोमध्ये प्रथमच ईशानने त्याच्या आणि अनन्या पांडेच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केले.

सिद्धांत चतुर्वेदी आहे सिंगल
करणने सर्वप्रथम सिद्धांतला त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसवर प्रश्न केला. ज्यावर सिद्धांतने सिंगल असल्याचा दावा केला आणि म्हणाला- 'मी इतका सिंगल आहे की माझ्यासोबत फिरल्यानंतर ईशानही सिंगल झाला आहे.' ज्यावर 'तू नुकतेच अनन्यासोबत ब्रेकअप केले आहे,' असे करणने ईशानला विचारले.

नाते तुटण्यासाठी अनन्याला जबाबदार धरले जाते
ईशानने करणच्या वक्तव्यावर आक्षेप घेत म्हटले - 'तुम्ही विचारले म्हणून सांगतो की, मी नव्हे तिने माझ्याशी ब्रेकअप केले आहे.'

ब्रेकअप हे परस्पर संमतीने होतात
करणने सांगितले की, ब्रेकअप नेहमीच परस्पर संमतीने होतात. ज्यावर कतरिना कैफने आक्षेप घेतला आणि प्रतिप्रश्न केला की, 'ब्रेकअप खरंच परस्पर संमतीने होतात का?' यावरुन कतरिनाने तिच्या जुन्या नात्यांकडे इशारा केला.

भविष्यातही मित्र म्हणून राहण्याची आशा आहे
करणने ईशानला विचारले की, तो अनन्याशी मैत्री कायम ठेवणार का. यावर ईशान म्हणाला की, ब्रेकअप कोणी आणि का केले याने काही फरक पडत नाही. माझा विश्वास आहे की, ती आयुष्यभर माझी चांगली मैत्रीण राहील. मी आत्तापर्यंत ज्या लोकांना भेटलो ते सगळ्यात कमाल आहेत. ती खूप प्रेमळ आहे, असे तिला भेटणारा प्रत्येक जण सांगेल. ईशान पुढे म्हणाला - हे सर्व प्रश्न बाजूला ठेवा, ती अशी व्यक्ती आहे जिच्यावर मी खूप प्रेम करतो आणि नेहमीच करत राहील.

बातम्या आणखी आहेत...