आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी तरी येणार येणार गं...!:लवकरच आई होणार आहे 'दृष्यम 2' फेम इशिता दत्ता, लग्नाच्या सहा वर्षांनंतर घरी हलणार पाळणा

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची ऑन स्क्रीन मुलगी अर्थातच 'दृश्यम 2' मध्ये दिसलेली अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. इशिता गरोदर असून नुकतेच तिला बेबी बंपसह स्पॉट करण्यात आले. इशिताचा लेटेस्ट लूक पाहून चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. इशिता ही बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची धाकटी बहीण तर अभिनेता वत्सल सेठची पत्नी आहे.

नुकतीच विमानतळावर दिसली इशिता
इशिता गरोदर असली तरी तिने अद्याप प्रेग्नेंसीबाबत कोणतीही पोस्ट किंवा माहिती दिलेली नाही. पण छायाचित्रकारांसमोर आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. नुकतीच ती मुंबई विमानतळावर दिसली. यादरम्यान पापाराझींनी तिला पाहिले. या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, ती लवकरच आई होणार आहे. यानंतर चाहत्यांनीही तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

2017 मध्ये झाले लग्न
इशिता दत्ताने 2017 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता वत्सल शेठशी लग्न केले. अजय देवगणच्या 'टार्जन द वंडर कार'मधून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या चित्रपटात तो अजय देवगणच्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. 'टार्जन'सोबतच वत्सलने 'हीरोज', 'पेइंग गेस्ट' आणि 'जय हो' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 'रिश्तों के सौदागर : बाजीगर' आणि 'हासिल' सारखे टीव्ही शोजही केले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे इशिता
इशिताला 'दृष्यम' (2012) या चित्रपटातून ओळख मिळाली होती. 'दृष्यम'मध्ये तिने अजय देवगणच्या मुलीची (अनु साळगावकर) भूमिका साकारली होती. दृष्यम 2 या चित्रपटातही ती झळकली. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटात तिच्यासह अजय देवगण, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू असे बडे स्टार्स दिसले होते. मुळची झारखंडमधील जमशेदपूरची असलेल्या इशिताने साउथ इंडियन फिल्ममध्येही काम केले आहे. टीव्ही सीरियल 'रिश्तों का सौदागर- बाजीगर'मध्ये इशिता लीड रोलमध्ये होती. यामध्ये तिच्यासोबत होता 'टार्जन द वंडर कार' फेम वत्सल सेठ होता. इशिता 'दृश्यम'सोबतच कपिल शर्मा स्टारर 'फिरंगी'मध्येही दिसली आहे.

तनुश्री दत्ताची छोटी बहिण आहे इशिता
इशिता दत्ता बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची धाकटी बहीण आहे. इशिताचे प्राथमिक शिक्षण जमशेदपूरमधील डीबीएम स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत आली होती. इशिताला ट्रॅव्हलिंग आणि कुकुंगची आवड आहे. याशिवाय तिला वाचनाचीही आवड आहे.

अनुपम खेर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतले अभिनयाचे धडे
12 वी पर्यंत जमशेदपूर येथे शिक्षण झाल्यानंतर इशिता मुंबईत बहिणीकडे आली. येथे तिने सोपाया कॉलेजमधून मास कम्यूनिकेशनमध्ये ग्रॅज्यूएशन केले. त्यानंतर अभिनयाकडे मोर्चा वळवला, त्यासाठी अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...