आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी अंत:मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिच्या मित्राचा गोव्यात अपघाती मृत्यू, कार खाडीत कोसळली; लवकरच येणार होता पहिला चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांच्या हातावर रिस्टबँड मिळाले आहेत. त्यावरुन दोघेही अपघातापूर्वी एखाद्या क्लबमध्ये गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा गोव्यात अपघाती मृत्यू झाला आहे. 20 सप्टेंबर रोजी उत्तर गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून या दोघांचा मृत्यू झाला आहे. लवकरच ईश्वरीचा पहिला मराठी चित्रपट येणार होता. ईश्वरी आणि शुभम हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जाते.

काय आहे संपूर्ण घटना?
सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावरुन जात असताना 25 वर्षीय ईश्वरी आणि 28 वर्षीय शुभम यांची कार खाडीत कोसळली. गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातावेळी कार कोण चालवत होता, हे समोर आलेले नाही. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि खाडीत जाऊन कोसळली. सकाळी सात वाजता अग्निशमन दल तेथे पोहोचले आणि त्या दोघांना गाडीमधून बाहेर काढले.’

याच कारमध्ये ईश्वरी आणि शुभम यांचे मृतदेह सापडले.
याच कारमध्ये ईश्वरी आणि शुभम यांचे मृतदेह सापडले.

अपघातापूर्वी एखाद्या क्लबमध्ये गेल्याचा अंदाज
दोघांच्या हातावर रिस्टबँड होते. अपघातापूर्वी हे दोघेही एखाद्या क्लबमध्ये गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शुभम हा पुण्यातील किर्कटवाडी येथील रहिवाशी होता. तर ईश्वरी ही देखील मुळची पुण्याची होती. अपघाताची माहिती मिळताच दोघांचे कुटुंबीय पुण्याहून गोव्यात दाखल झाले आहे.

ईश्वरीचा लवकरच पहिला मराठी चित्रपट येणार होता.
ईश्वरीचा लवकरच पहिला मराठी चित्रपट येणार होता.

मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय
ईश्वरी ही अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत होती. तिने आजवर काही मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ती हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. काही दिवसांपूर्वी तिने एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते.

बातम्या आणखी आहेत...